Gig Workforce in India: भारतामध्ये 2025 पर्यंत 9-11 दशलक्ष नोकऱ्यांची भर पडण्याची शक्यता आहे. जी दीर्घकाळातील सर्वात महत्त्वपूर्ण आर्थिक बदलांपैकी एक आहे, असे एका अहवालात दिसून आले आहे. एम्प्लॉयमेंट साइटने उघड केले आहे की भारतात पुढील तीन तीन वर्षांत 9 दशलक्षाहून अधिक गिग कामगार जोडले जातील. गिग कामगार हे फ्रीलांसर किंवा कंत्राटदार असतील. जे स्वतंत्रपणे काम करतील. त्यांचे कार्य प्रकल्प-आधारित, तासावार किंवा अर्धवेळ असू शकते.नीती आयोगानुसार 2029-30 पर्यंत गिग वर्कफोर्स 23.5 दशलक्ष कामगारांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. सध्या, सुमारे 47% गिग कामगार मध्यम कुशल नोकऱ्यांमध्ये, सुमारे 22% उच्च कुशल नोकऱ्यांमध्ये आणि सुमारे 31% कमी कुशल नोकऱ्यांमध्ये आहेत, असे नीती आयोगाने अहवाल म्हटले आहे.
NASSCOM, Indeed आणि AON द्वारे नोव्हेंबर 2022 मध्ये केलेल्या सर्वेक्षणात, हे उघड झाले आहे की साथीच्या रोगानंतर, नियोक्ते 12 महिने किंवा त्याहून अधिक कालावधीसाठी गिग कामगारांना कामावर घेण्यास उत्सुक आहेत. गीग कामगारांना नियुक्त करणार्या भारतीय टेक कंपन्यांचा हिस्सा देखील 2020 मध्ये 57% च्या तुलनेत 2022 मध्ये 65% पर्यंत वाढला आहे. (हेही वाचा - UPSC Recruitment 2022: केंद्रीय लोकसेवा आयोगाने विविध पदांसाठी जाहीर केली भरती प्रक्रिया; उमेदवाराला मिळणार 7 व्या वेतन आयोगानुसार पगार)
India is likely to see its gig workforce add 9-11 million jobs by 2025, which has been one of the most pivotal economic shifts in a long time, a report showed. pic.twitter.com/voJsONavRw
— IANS (@ians_india) December 7, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)