UPSC Recruitment 2022: केंद्रीय लोकसेवा आयोगाने (Union Public Service Commission, UPSC) वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक (Senior Scientific Assistant), विशेषज्ञ ग्रेड-III सह अनेक पदांसाठी भरती 2022 साठी अधिसूचना जारी केली आहे. सरकारी नोकऱ्यांसाठी तयारी करणारे उमेदवार आयोगाच्या (UPSC) अधिकृत वेबसाइट upsc.gov.in द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.
UPSC भर्ती 2022 च्या अधिसूचनेनुसार, विविध पदांवरील एकूण 43 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती मोहीम सुरू करण्यात आली आहे. अर्ज सुरू झाले आहेत, पात्र उमेदवार 15 डिसेंबर 2022 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात. निवडलेल्या उमेदवारांना 7 व्या वेतन आयोगाअंतर्गत (7th Pay Commission) वेतन दिले जाईल. (हेही वाचा - Kerala Education Pattern in Maharashtra: महाराष्ट्रात शालेय शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी सरकार ' केरळ पॅटर्न' राबवण्याच्या विचारात)
UPSC Vacancy 2022 Details -
- वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक: 18 पदे
- कनिष्ठ खाण भूगर्भशास्त्रज्ञ: 7 पदे
- सहाय्यक खाण भूगर्भशास्त्रज्ञ: 6 पदे
- सहाय्यक कृषी विपणन सल्लागार: 5 पदे
- स्पेशलिस्ट ग्रेड III: 4 पदे
- रसायनशास्त्रज्ञ: 3 पदे
- एकूण रिक्त पदांची संख्या - 43 पदे
शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा -
मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. याशिवाय पदनिहाय कामाचा अनुभवही मागवण्यात आला आहे. पात्र उमेदवारांची कमाल वयोमर्यादा 30 वर्षे आणि 40 वर्षे आहे. तथापि, सरकारी निकषांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयाची सूट दिली जाईल. तुम्ही नोटिफिकेशनमध्ये पोस्टनिहाय शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादेचे संपूर्ण तपशील तपासू शकता. (हेही वाचा - 4-year UG Programmes From 2023-24: आगामी शैक्षणिक वर्षापासून पदवीचा अभ्यासक्रम 4 वर्षांचा)
अर्ज फी -
उमेदवारांना 25 रुपये शुल्क भरावे लागेल. फक्त रोखीने किंवा SBI च्या नेट बँकिंग सुविधेचा वापर करून किंवा व्हिसा/मास्टर क्रेडिट/डेबिट कार्ड वापरून उमेदवार शुल्क भरू शकतो. SC/ST/PWBD/महिला उमेदवारांसाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही.