Bengaluru News: बेंगळूरूच्या दोड्डानेकुंडी भागात पार्किच्या जागेवरून एका जोडप्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ही घटना एकाने कॅमेऱ्यात कैद केली. हे जोडपं कर्नाटकातील बेलगावातील आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे,घरासमोर कार पार्किंग केल्यामुळे जोडप्यांना मारहाण करत आहे. त्यांना शिवीगाळ करत आहे. बाहेर खुल्या जागेवर मैदानात पार्किंग केल्याचा रागातून त्यांच्यात वाद झाला. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी तक्रार नोंदवला आहे. या घटनेचा पुढील तपास सुरु आहे. (हेही वाचा- सासरच्या माणसांकडून महिलेला बेदम मारहाण, तिघांना अटक, मैनपूरी येथील घटना

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)