मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे भाऊ अग्रसेन गेहलोत यांच्या घरावर सीबीआयचा छापा टाकला आहे. यापूर्वी ईडीने अग्रसेन गेहलोत यांच्या घरावर छापा टाकला होता. सीबीआयच्या या कारवाईचा संबंध अशोक गेहलोत यांनी राहुल गांधी यांच्यासाठी दिल्लीत केलेल्या निषेधाशी जोडला जात आहे. माहितीनुसार, सीबीआयचे पथक शुक्रवारी सकाळी सीएम गेहलोत यांचे भाऊ अग्रसेन गेहलोत यांच्या घरी पोहोचले. या टीममध्ये पाच अधिकारी दिल्लीचे तर पाच अधिकारी जोधपूरचे आहेत. सध्या पथकातील सदस्य तपासात गुंतले आहेत. तर अग्रसेन गेहलोत घरीच आहेत.
Tweet
CBI raids underway at the residence of Rajasthan CM Ashok Gehlot's brother, Agrasen Gehlot in Jodhpur. pic.twitter.com/xwtkoK6bjn
— ANI (@ANI) June 17, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)