Bus Accident Video:  आंध्रप्रदेशातील विजयवाडा बसस्थानावर बससाठी प्रतिक्षा करणाऱ्या प्रवाशांचा अपघाती मृत्यू झाला आहे. या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बसवरील नियत्रंण सुटल्याने बस थेट प्रतिक्षालयात घुसली आणि  तेथील प्रवाशांना धडकली. या धडकेत तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. धक्कदायक म्हणजे पार्किंग लॉटमध्ये थांबलेली बस अचानक अनियंत्रितपणे प्रतिक्षालयात घुसली. विजयवाडा येथील पंडित नेहरू या बस स्थानकावर अपघात झाला. अनियंत्रित बस प्रतिक्षालयात घुसली आणि  बसलेल्या प्रवासांना चिरडले. बसने रेलिंग तोडून प्रवाशांना चिरडले ही संपुर्ण घटना सीसीटीव्हीत कैद आहे.

(हेही वाचा- कारच्या धडकेत वृध्द महिलेसोबत दोघांचा दुर्दैवी मृत्यू, वाहनचालकाला अटक)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)