Buldhana Accident: कारच्या धडकेत वृध्द महिलेसोबत दोघांचा दुर्दैवी मृत्यू, वाहनचालकाला अटक
Accident (PC - File Photo)

Buldhana Accident:   रस्ते अपघाताची मालिका ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. बुलढाणा जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर येत आहे. तीन महिला शेत मजूरांचा शेतातून घरी जात असताना अपघाता झाला आहे. या अपघातात तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रस्त्यावरून जात असताना तीन महिलेला एका भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने अपघात झाला. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच कारचालकावर गुन्हा दाखल झाला. त्याला तात्काळ अटक केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जामोद गावातील महिला कामासाठी शेतात आली होती. माय लेकी आणि एक वृध्द महिला सकाळी कामानिमित्त शेतात गेल्या होत्या. दिवसभर काम संपवून तिघी घरी जात होत्या. रस्त्याने जात असताना अचानक वळणाच्या रस्त्यावर भरधाव कार पाठी मागून आली. तिघींना कारने जोरदार धडक दिली. या धडकेत तिघींही जमिनीवर कोसळल्या. अपघातात तिघींचा ही मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. त्यांनी आरोपी कार चालकाला ताब्यात घेतले. बुलढाणा पोलिस ठाण्यात कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले आहे. या घटनेची माहिती पोलिसांनी त्यांच्या कुटुंबियांना दिली आहे.