Jammu and Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये आरएस पुराच्या अरनिया सेक्टरमधील आंतरराष्ट्रीय सीमेवर रात्री उशिरा सीमा सुरक्षा दलांनी घुसखोरी करणाऱ्याचा प्रयत्न करणाऱ्याला गोळी घालून ठार केले. पहाटे 1.50 च्या सुमारास एका घुसखोराचा मृत्यू झाला. यानंतर परिसरात सीमा सुरक्षा दलाकडून शोधमोहीम सुरू आहे. बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला आहे. रात्री उशिरा सीमा सुरक्षा दलांनी घुसखोराला ठार केल्याचे त्यांनी सांगितले. या संदर्भात ANI ने पोस्ट शेअर केली आहे. सीमा सुरक्षा दल आता सर्तक राहीले आहे आणि याचा पाठपुराव घेत शोधमोहिम सुरु केली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)