PM Modi Celebrates Diwali With BSF Jawans: देशभरात आज दिवाळीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा होत आहे. अशा परिस्थितीत दरवर्षीप्रमाणे या वर्षीही पंतप्रधान मोदी सैनिकांसोबत दिवाळी साजरी करताना दिसले. यावेळी पंतप्रधान मोदी सैनिकांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी गुजरातच्या कच्छमध्ये आले पोहोचले. यादरम्यान, पंतप्रधान मोदींनी स्वत:च्या हाताने जवानांना मिठाई खाऊ घालत त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच गुजरातमध्ये सैनिकांसोबत दिवाळी साजरी करत आहेत. यापूर्वी ते गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी गुजरातच्या सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली होती. केवडिया येथे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना पुष्पांजली अर्पण केल्यानंतर पंतप्रधान मोदी कच्छमध्ये पोहोचले आहेत, येथे पंतप्रधान सैनिकांसोबत वेळ घालवत आहेत. यावेळी पंतप्रधानांनी सैनिकांना प्रोत्साहन दिले. त्यांनी सैनिकांशी संवाद साधला आणि त्यांची प्रकृती जाणून घेतली. मिळालेल्या माहितीनुसार, पीएम मोदींनी कच्छमध्ये जवानांसोबत 1 तास घालवला आणि जवानांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

पीएम मोदींनी बीएसएफ जवानांसोबत साजरी केली दिवाळी, पहा व्हिडिओ - 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)