Cheetah Died of Heart Attack: सौदी राजकुमाराने भेट दिलेल्या 15 वर्षांच्या नर चित्ताचा हैदराबादच्या नेहरू प्राणी उद्यानात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ‘अब्दुल्ला’ नावाच्या चित्ताचा शनिवारी मृत्यू झाला, असे प्राणिसंग्रहालयाच्या अधिकाऱ्याने आयएएनएसला सांगितले. प्राणिसंग्रहालयाच्या अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन केले ज्यामध्ये हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हैदराबाद येथे आयोजित CoP11 शिखर परिषद-2012 च्या निमित्ताने प्राणिसंग्रहालयाच्या भेटीदरम्यान, सौदी राजकुमार बंदर बिन सौद बिन मोहम्मद अल सौद यांनी आफ्रिकन सिंह आणि चित्ताच्या दोन जोड्या भेट देण्याची घोषणा केली होती. प्राणीसंग्रहालयाला 2013 मध्ये सौदी अरेबियाच्या राष्ट्रीय वन्यजीव संशोधन केंद्राकडून प्राणी मिळाले होते. मादी चित्ता 2020 मध्ये मरण पावली आणि तेव्हापासून 'अब्दुल्ला' नावाचा नर चित्ता एकटाच होता. 'हिबा' या मादी चित्ताचा वयाच्या आठव्या वर्षी मृत्यू झाला. तिला पॅराप्लेजिया झाल्याचे निदान झाले होते.
A 15-year-old male Cheetah gifted by the Saudi Prince a decade ago died of a heart attack at the Nehru Zoological Park in #Hyderabad. pic.twitter.com/nJcU8zf3NO
— IANS (@ians_india) March 26, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)