Rautu Ka Raaz OTT Release: नवाजुद्दीन सिद्दीकी स्टारर 'रौतू का राज' ओटीटीवर रिलीजसाठी सज्ज; कधी आणि कुठे पाहता येणार? घ्या जाणून
नवाजुद्दीन सिद्दीकीचा आगामी चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. 'रौतू का राज' या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी इन्स्पेक्टर दीपक नेगीच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद सुरापूर यांनी केले आहे.
Rautu Ka Raaz OTT Release: रौतू का राज OTT प्लॅटफॉर्म ZEE5 वर रिलीजसाठी सज्ज आहे. चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी(Nawazuddin Siddiqui) पोलिस निरीक्षक दीपक नेगीच्या मुख्य भूमिकेत आहे. त्याशिवाय, राजेश कुमार आणि अतुल तिवारी यांच्या प्रमुख भूमिकेत असलेला हा चित्रपट 28 जून रोजी ZEE5 वर रिलीज होणार आहे. छोट्या शहरातील पोलिस निरीक्षक दीपक नेगीला मसुरीमध्ये झालेल्या हत्येच्या प्रकरणाची उकल करण्यास सांगितले जाते. तेव्हा कशा घडामोडी घडतात हे चित्रपटाच्या माध्यमातून दाखवले आहे. (हेही वाचा:Zee One आफ्रिका चॅनलवर Marathi serial इंग्रजीत डब करून प्रदर्शित; भाषांतर पाहून नेटकऱ्यांनी दिल्या भन्नाट प्रतिक्रीया )
Negi hai toh ye raaz bahar aa hi jayega, jald! 😎#RautuKaRaaz premieres 28th June, only on #ZEE5#RautuKaRaazOnZEE5 pic.twitter.com/GaJ7YRddwA
— ZEE5 (@ZEE5India) June 25, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 25, 2024 05:31 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

