‘Kesari 2’ OTT Release Date: अक्षय कुमार आणि आर. माधवन यांचा हिट चित्रपट 'केसरी: चॅप्टर 2' ओटीटीवर होणार रिलीज

थिएटरमध्ये धमाल केल्यानंतर 'केसरी: चॅप्टर 2' आता ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. अक्षय कुमार आणि आर. माधवन अभिनीत हा चित्रपट जालियनवाला बाग हत्याकांड आणि त्याच्या परिणामांची कहाणी सांगतो.

‘Kesari 2’ OTT Release Date: अक्षय कुमार आणि आर. माधवन यांचा हिट चित्रपट 'केसरी: चॅप्टर 2' ओटीटीवर होणार रिलीज
Photo Credit- X

‘Kesari 2’ OTT Release Date: केसरी चॅप्टर वनचा सिक्वेल 'केसरी 2' हा ('Kesari: Chapter 2') एक कोर्टरूम ड्रामा आहे. ज्यामध्ये वकील सी. शंकरन नायर यांच्या भूमीकेत अक्षय कुमार (Akshay Kumar ) दिसत आहे. 1919 च्या जालियनवाला हत्याकांडानंतर सी. शंकरन नायर यांनी कोर्टात ब्रिटिशांविरुद्ध खटला लढला आणि मारल्या गेलेल्या लोकांना न्याय मिळवून देण्याबाबत केसरी २ची कथा आहे.

'केसरी: चॅप्टर 2'13 जूनपासून जिओ हॉटस्टारवर

अक्षय कुमारने सी. शंकरन नायर यांच्या पात्राला रुपेरी पडद्यावर जिवंत करण्याचा प्रयत्न केला. चित्रपटगृहात प्रेक्षकांनी सिनेमाला चांगला प्रतिसाद दिला. आता ही कथा म्हणजेच 'केसरी: चॅप्टर 2' 13 जूनपासून ओटीटी प्लॅटफॉर्म जिओ हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. 13 जूनपासून घरी बसून हा चित्रपट चाहते अनुभवू शकतील. या चित्रपटात अनन्या पांडे देखील आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 12, 2025 05:13 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).