सध्या बॉलिवूड अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) आणि अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) त्यांच्या आगामी 'बवाल' (Bawaal) चित्रपटामुळे चर्चेत आहेत. त्याचवेळी या चित्रपटाचा टीझर आज म्हणजेच बुधवारी रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटात वरुण आणि जान्हवी पहिल्यांदाच एकत्र दिसणार असून हा रोमँटिक-ड्रामा चित्रपट आहे. 'बवाल' चित्रपटाचा टीझर एक मिनिट चोवीस सेकंदाचा आहे, जो चाहत्यांना खूप आवडला आहे. वरुण आणि जान्हवीचा आगामी 'बवाल' चित्रपट नितेश तिवारी यांनी दिग्दर्शित केला आहे. त्याचबरोबर या चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियादवाला यांनी केली आहे. इतकंच नाही तर टीझरसोबत चित्रपटाची रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे. हा चित्रपट 21 जुलै रोजी प्राइमवर प्रदर्शित होणार आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)