बॉलीवूडचा सुपरस्टार शाहरुख खान सध्या त्याच्या ‘जवान’ या चित्रपटाद्वारे केवळ देशातच नाही तर परदेशातही धुमाकूळ घालत आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने चांगली कमाई केली असून, अजूनही हा चित्रपट पाहण्यासाठी लोक चित्रपटगृहात गर्दी करत आहेत. आता जवानच्या यशानंतर किंग खानने मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. शाहरुख खानने त्याचा धाकटा मुलगा अबराम आणि त्याच्या मॅनेजरसोबत लालबागचा राजा मंडळाला भेट दिली. याचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (हेही वाचा: Ganesh Visrjan 2023: शिल्पा शेट्टी हिच्याकडून गणरायाला निरोप)

#WATCH | Shah Rukh Khan visits Lalbaugcha Raja in Mumbai to seek blessings from Lord Ganesh pic.twitter.com/NqIvMMi2uz

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)