बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खान आजकाल त्याच्या अनेक प्रोजेक्ट्समुळे चर्चेत आहे, त्यापैकी एक म्हणजे 'मुफासा: द लायन किंग', जो या महिन्यात ख्रिसमसच्या खास मुहूर्तावर थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातून अबराम खान त्याच्या करिअरला सुरुवात करणार आहे. या चित्रपटात तो यंग मुफासाचा आवाज देणार आहे. त्याचबरोबर शाहरुख खान प्रौढ मुफासाचा आवाज देत आहे, तर आर्यन खान सिंबाला आवाज देत आहे. मात्र या चित्रपटाच्या पोस्टरबाबत वाद निर्माण झाला आहे. मुफासा: द लायन किंग' (हिंदी) या चित्रपटाच्या पोस्टरवर शाहरुख खानच्या मुलांची, आर्यन खान आणि अबराम खान यांची नावे प्रथम आणि मोठ्या अक्षरात लिहिली आहेत. त्यानंतर खाली छोट्या अक्षरात प्रसिद्ध मराठी अभिनेते मकरंद देशपांडे, श्रेयस तळपदे आणि संजय मिश्रा या कलाकारांची नावे दिली आहेत. याबाबत मराठी टीव्ही स्टार योगिता चव्हाणने टीका केली आहे. तिची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
आपल्या पोस्टमध्ये योगिता म्हणते, ‘शाहरुख खान समजू शकतो. पण आर्यन खान आणि अबराम खान यांचे नाव बोल्डमध्ये का? बाकी दिग्गज मकरंद देशपांडे, संजय मिश्रा, श्रेयस तळपदे यांचे नाव असे अशी सेकंडरी लिहायचे असे किती चुकीचे आहे? नक्कीच या सगळ्यांचे फिल्म इंडस्ट्रीसाठीचे योगदान अबराम खान आणि आर्यन खानपेक्षा जास्तच आहे.’ (हेही वाचा: Vikrant Massey 2025 मध्ये अभिनय प्रवास संपवणार, 'आम्ही शेवटच्या वेळी एकमेकांना भेटू' असे पोस्ट करून केले जाहीर)
Mufasa the Lion King' Poster-
Yogita Chavan took to Instagram and expressed her disappointment with Mufasa: The Lion King poster which credits Shah Rukh Khan and his sons Aryan and AbRam above other seasoned actors. #shahrukhkhan #MufasaTheLionKing #yogitachavan #aryankhan #marathiactress pic.twitter.com/tAjFdpkG7f
— Mid Day (@mid_day) December 2, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)