बिग बॉस 16 मध्ये अभिनेता-दिग्दर्शक साजिद खानच्या एंट्रीने बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा मी टूची चर्चा सुरू झाली आहे. 2018 मध्ये सुमारे 10 अभिनेत्री, मॉडेल आणि जर्नलिस्टनी साजिदवर लैंगिक छळाचे आरोप केले होते. तेव्हापासून साजिदचा चित्रपटांवर बहिष्कार सुरू झाला. आता 4 वर्षांनंतर तो बिग बॉस-16 मध्ये छोट्या पडद्यावर दिसत असून पुन्हा मी-टूची चर्चा सुरू झाली. नुकतेच स्वतःशी लग्न करून प्रसिद्धीच्या झोतात आलेली टीव्ही अभिनेत्री कनिष्का सोनी हिने साजिदवर खळबळजनक आरोप केले आहेत. कनिष्काने सांगितले की, साजिद हाच तो दिग्दर्शक होता ज्याने तिला तिचे शरीर दाखवण्यासाठी टॉप काढण्यास सांगितले. एका चित्रपटामध्ये भूमिका देण्याच्या बहाण्याने साजिदने कनिष्काला घरी बोलावून कपडे काढण्यास सांगितल्याचा आरोप होत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)