Diary of Home Minister Book: माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख हे महाविकास आघाडी (MVA) सरकार पाडण्याच्या कटाचा उलगडा करणारे, तसेच त्यांच्यावरील खोटे आरोप नमूद करणारे पुस्तक प्रकाशित करण्याच्या तयारीत आहेत. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या असता त्यांच्या ‘डायरी ऑफ होम मिनिस्टर’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील एमव्हीए सरकारमध्ये गृहमंत्री असलेले देशमुख यांना भ्रष्टाचार आणि मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली अटक केल्यानंतर, 13 महिन्यांहून अधिक कालावधीनंतर आर्थर रोड तुरुंगातून मुक्त करण्यात आले. देशमुख यांच्या विरोधात महायुती सरकारच्या नेत्यांनी षडयंत्र रचले आणि त्यामुळे त्यांना तुरुंगात जावे लागले, असा आरोप विरोधी महाविकास आघाडी करत आहे.

देशमुख यांनी या पुस्तकाबाबत माहिती देताना सांगितले, ‘राज्यात महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मी गृहमंत्री असताना षडयंत्र रचून माझ्यावर खोटे आरोप करण्यात आले. #ED आणि #CBI च्या चौकशीचा ससेमिरा लावून मला १४ महिने तुरुंगात टाकण्यात आले. माझ्यावर दबाव टाकून महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा प्रयत्न झाला. मला प्रचंड त्रास देण्यात आला. मी तुरुंगात असताना यावर पुस्तक लिहायला घेतले होते. ते "डायरी ऑफ होम मिनिस्टर" हे पुस्तक छापून तयार झाले असून, लवकरच मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेत बाजारात उपलब्ध होणार आहे.’ (हेही वाचा: Vijaya Rahatkar यांनी स्वीकारला National Commission for Women च्या अध्यक्षपदाचा पदभार)

Diary of Home Minister Book:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)