Viral Video: सोशल मीडियावर दररोज नव-नवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओ नेटीझन्सला विचार करायला लावतात. शनिवारी समोर आलेल्या व्हिडीओमध्ये, एक दुचाकीस्वार आपली दुचाकी भरधाव वेगात चालवताना दिसत आहे. तर या दुचाकीवर बसलेली तरुणी दोन्ही हातात बंदूक घेऊन हवेत फिरवताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या व्हिडिओची दखल घेत पाटणाचे पोलिस अधीक्षक वैभव शर्मा यांनी दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. आम्ही दुचाकीचा नोंदणी क्रमांक ओळखण्यासाठी आणि गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न करत आहोत. त्यांच्यावर लवकरच कारवाई केली जाईल, असं शर्मा यांनी म्हटलं आहे.
अशीच एक घटना काही महिन्यांपूर्वी पटनाच्या 'मरीन ड्राईव्ह'मध्ये बाईकवर एक मुलगी बंदूक हलवत असताना घडली होती. त्यानंतर पाटणा पोलिसांनी तिला लोहानीपूर परिसरातून अटक केली होती. तपासादरम्यान कळले की, मुलीने बंदुकीचा आकार असलेला लायटर धरला होता.
पिताजी की राजदुलारी दोनों हाथ में पिस्तौल लेकर बाइक पर खड़ी है और रील बनवा रही है..
मामला पटना के मरीन ड्राइव का pic.twitter.com/lMRGzM2Oom
— Mohammad Imran (@ImranTG1) August 20, 2023
तथापी, या तरुणीला 34,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून तिच्या दुचाकीची नोंदणीही एक वर्षासाठी रद्द करण्यात आली आहे. दरम्यान, पाटना पोलिस आता सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या नव्या व्हिडिओचा तपास करत आहेत.