जगातल्या अनेक विचित्र गोष्टींबद्दल तुम्ही ऐकले असेल. जगात असाही एक देश आहे, जो आपल्या विचित्र प्रथांसाठी ओळखला जातो तो म्हणजे इस्वातिनी (Eswatini). दक्षिण आफ्रिकेमधील हा देश त्याच्या गरीबीसाठीही जगात प्रसिद्ध आहे. हा जगातील सर्वात गरीब देशांपैकी एक असून, इथले सुमारे 60 टक्के लोक दारिद्र्य रेषेखालील जगतात. पण तरीही या देशाचा राजा त्याच्या विलासी जीवनासाठी प्रसिद्ध आहे. सध्या इथे मस्वति-3 (Mswati III) या राजाचे राज्य आहे. या राजाने नुकतेच आपल्या 15 पत्नींसाठी तब्बल 127 कोटी रुपयांच्या लक्झरी कार्स विकत घेतल्या आहेत.
मस्वति-3 राजाने विकत घेतलेल्या गाड्या -
HEARTBREAKING NEWS: Amidst all the economic challenges eSwazitini, King Mswati III yesterday decided to bless his wives with very expensive wheels pic.twitter.com/QzGTT1uvfC
— Mzilikazi wa Afrika (@IamMzilikazi) October 30, 2019
एकीकडे देश कंगाल होत आहे, लोकांकडे खाण्यासाठी पैसे नाहीत मात्र इथल्या राजाचे आपल्या पत्नींवर भारी प्रेम. त्यांच्यासाठी त्याने नुकतेच 127 कोटी रुपये गाडी घेण्यावर खर्च केले. राजा मस्वति-3ने आपल्या 15 पत्नींसाठी 15 रोल्स रॉयसेस आणि डझनभर बीएमडब्ल्यू कार खरेदी केल्या आहेत. या गोष्टीमुळे आता सामान्य जनता राजाचा विरोध करत आहे.
या राची स्वतःची एकूण संपत्ती 1434 कोटी आहे. राजाचे खासगी विमान तसेच स्वतःचे विमानतळ आहे. मस्वति-3 1986 पासून राजाच्या पदावर बसला आहे. हा राजा विवादाच्या भोवऱ्यात सापडण्याची ही पहिली वेळ नाही, 1841 कोटी रुपये खर्च करून लक्झरी जेट खरेदी करण्यासाठी याआधी तो वादात अडकला होता. (हेही वाचा: हृतिक रोशन याच्यावर क्रश असणाऱ्या बायकोची हत्या करत नवऱ्याने सुद्धा गळफास लावत संपवले आयुष्य)
इस्वातिनी देशात दरवर्षी टॉपलेस कुमारी मुलींचे परेड असते आणि यामध्ये प्रत्येक वर्षी राजा स्वत: साठी नवीन पत्नीची निवड करतो. असे म्हटले जाते की, या काळात ज्या मुली या परेडमध्ये येत नाहीत त्यांना शिक्षा केली जाते. याआधी अनेकवेळा टॉपलेस कुमारी मुलींच्या प्रर्दशनामध्ये राजाची पत्नी निवडण्याच्या प्रथेवर आक्षेप घेण्यात आला हता, परंतु बर्याच निषेधानंतरही ही प्रथा थांबविण्यात आली नाही. अशाप्रकारे या राजाने एकूण 15 लागणे केली आहेत.