तुम्ही आतापर्यंत सापाचा डान्स करतानाचा व्हिडिओ (Snakes Dancing Video) पाहिला असेल. मात्र, दोन सापाला एकत्र डान्स करताना कधी पाहिलं नसेल. सध्या सोशल मीडियावर दोन सापांचा एकत्र डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. बेंगळूरूमध्ये राहणाऱ्या वसुधा वर्मा (Vasudha Verma) या ट्विटर युर्झरसने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. वसुधा वर्मा यांनी गोल्फ कोर्सवर डान्स करत असताना या सापाचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये शुट केला आहे. 36 सेकंदाचा हा व्हिडिओ अनेक नेटीझन्सनी पाहिला आहे.
गोल्फ कोर्समधील दोन सापांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटीझन्सनी मात्र, याबाबत शंका उपस्थित केली आहे. काहींच्या मते हे साप भांडण करत आहेत. तर काहींच्या मते हे दोघे एकत्र डान्स करताना दिसत आहेत. तसेच काहींच्या मते हे दोन साप संभोग करत आहेत. परंतु, काहींना हा दावा फेटाळून लावला आहे. (हेही वाचा - काय सांगता..! चक्क बेडकाने सापाला खाल्लं? पाहा थरारक व्हिडिओ)
A cosy corner in a golf course becomes a dance floor. Gracious, synchronised swirling and twirling! Beauty is nature. @SudhaRamenIFS @ParveenKaswan @rameshpandeyifs @susantananda3 pic.twitter.com/0aVyyz27XK
— Vasudha Varma (@VarmaVasudha) March 11, 2020
वसुधा वर्मा या AnitaB.org India कंपनीच्या डायरेक्टर आहेत. त्यांनी हे साप डान्स करत असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी हा व्हिडिओ शेअर करताना चार भारतीय वनअधिकाऱ्यांना टॅग केलं आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 9 हजार लोकांनी पाहिला आहे. ट्विटरवरील युझर्संनी हा नागीण डान्स असल्याचं म्हटलं आहे.