Elephant Trampled Mahout (PC - X/@ManyFaces_Death)

Elephant Trampled Mahout: केरळ (Kerala) मधून अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुवार, 20 जून रोजी एका माहूतला (Mahout) हत्ती (Elephant) ने पायदळी तुडवून ठार मारले. या घटनेचा त्रासदायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये हत्ती माहूतवर हल्ला करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये हत्ती माहूतला पायदळी तुडवताना दिसत आहे. हत्तीने अगदी निर्जीव वस्तूप्रमाणे माहुताला चिरडवतो आणि नंतर त्याचा सांगाडा सोंडेने फेकून देतो. द हिंदूने दिलेल्या वृत्तानुसार, वनविभागाने इडुक्की येथील बेकायदेशीर हत्ती सफारी केंद्राविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. बालकृष्णन असं हत्तीने पायदळी तुडवलेल्या माहुताचे नाव आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, बालकृष्णन हे दुसरे माहूत होते जे पर्यटकांना सफारीवर घेऊन जाण्यासाठी थांबले होते. तेव्हाच हत्तीने त्यांच्यावर हल्ला केला. शवविच्छेदन तपासणीनंतर माहूताचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

मनोरंजनासाठी वापरल्या जाणाऱ्या प्राण्यांसाठी आवश्यक असलेल्या भारतीय पशु कल्याण मंडळाकडे केंद्रातील हत्तींची नोंदणी करण्यात आली नव्हती. इडुक्की सामाजिक वनीकरण विभागीय वन अधिकारी (डीएफओ) पी.के. विपिनदास यांनी असे नमूद केले की, मालकाला हत्तीला कोट्टायम येथे हलविण्याची सूचना देण्यात आली होती, जिथे त्याची वन विभागाअंतर्गत नोंदणी आहे. (हेही वाचा -Dog Terror in Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरमध्ये कुत्र्यांची दहशत; रस्त्यावर चालणाऱ्या तरुणीवर हल्ला करण्याचा प्रयत्न, व्हिडिओ व्हायरल)

पहा व्हिडिओ -

अहवालानुसार, इडुक्कीमधील आठ सफारी केंद्रांमध्ये 35 हत्तींचा वापर केला जातो, परंतु प्राणी कल्याण मंडळाकडे फक्त चार हत्तींची नोंदणी आहे. या घटनेतील हत्तीने यापूर्वीही माहुत यांच्याबाबत आक्रमक वर्तन केले होते. इडुक्की जिल्हाधिकारी शीबा जॉर्ज यांनी सांगितले की, जिल्हा प्रशासन बेकायदेशीर सफारी केंद्रांना चालवण्यास परवानगी देणार नाही. तसेच वन विभाग नियमित तपासणी करेल आणि अशा आस्थापनांवर कठोर कारवाई करेल.

एम. एन. सोसायटी फॉर द प्रिव्हेंशन ऑफ क्रुएल्टी टू ॲनिमल्स (SPCA) चे जिल्हा सचिव जयचंद्रन यांनी बेकायदेशीर सफारी केंद्रांचा प्रसार रोखण्यात अपयशी ठरल्याबद्दल जिल्हाधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांकडून जबाबदारीची मागणी केली. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, सफारी केंद्रांमध्ये किंवा मनोरंजनासाठी वापरण्यासाठी हत्तींची नोंदणी प्राणी कल्याण मंडळाकडे करणे आवश्यक आहे, हा नियम बऱ्याच केंद्रांद्वारे दुर्लक्ष केला जातो, असं जयचंद्रन यांनी नमूद केलं.