Shilpa Shetty आपली बहिण Shamita सह थिरकली दिवंगत ज्येष्ठ अभिनेते शम्मी कपूर यांच्या 'या' सदाबहार गाण्यावर, Watch Video
Shilpa Shetty And Shamita Shetty Dance (Photo Credits: Instagram)

बॉलिवूडचा एक असा तारा ज्यांनी आपल्या अनोख्या डान्स स्टाईलने अवघ्या देशवासियांवर भुरळ पाडली ते म्हणजे दिवंगत ज्येष्ठ अभिनेते शम्मी कपूर ... (Shammi Kapoor). या हू, तुमसे अच्छा कौन है, बदन पे सितारे यांसारखी अनेक अजरामग गाणी आजही लोकांच्या मनात कायम आहे. ही गाणी ऐकली की पहिले डोळ्यासमोर येतो तो शम्मी कपूर यांचे बेभान होऊन नाचतानाचे दृश्य. यातील एका शम्मी कपूर यांच्या सदाबहार गाण्यावर नाचताना दिसल्या अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि तिची बहिणी शमिता शेट्टी (Shamita Shetty). हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

शिल्पा शेट्टी आणि शमिता शेट्टी शम्मी कपूर यांच्या 'बदन पे सितारे लपटें हुए' या गाण्यावर बेभान होऊन नाचताना दिसत आहे. "मी माझ्या आवडत्या कलाकाराच्या गाण्यावर त्यांच्याशी थोड्या मिळत्या जुळत्या स्टेप्स माझी डान्स पार्टनर शमिता सोबत करत आहे." असे कॅप्शन शिल्पाने या पोस्ट खाली लिहिले आहे. या व्हिडिओला 10 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. हेदेखील वाचा- Makar Sankranti 2021: शिल्पा शेट्टी आणि बहिण शमिताने खास मराठमोळ्या अंदाजात दिल्या चाहत्यांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा, Watch Video

शिल्पा शेट्टी सोशल मिडियावर खूपच सक्रिय असते. आपल्या योगाचे व्हिडिओ, मजेशीर व्हिडिओ तसेच आपल्या रेसिपीजचे व्हिडिओ देखील ती टाकत असते. दरम्यान मकर संक्रांती निमित्त देखील बहिण शमितासोबत मराठमोळ्या अंदाजात सर्वांना या मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या. हा व्हिडिओ देखील सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाला.

शमिताविषयी बोलायचे झाले तर ती गेल्या काही काळापासून रुपेरी पडद्यापासून थोडी दूरच आहे. मात्र आपल्या कुटूंबासोबतचे, मित्र परिवारासोबतचे अनेक व्हिडिओ ती सोशल मिडियावर शेअर करत असते.