आज संपूर्ण देशभरात मकर संक्रांती (Makar Sankranti 2021) सणाचा उत्साह दिसून येत आहे. आज अनेक ठिकाणी पतंग उडविण्याचा कार्यक्रम रंगतो. तर महाराष्ट्रीयन सवाष्णांचा हळदी कुंकूवाचा कार्यक्रम देखील विशेष असतो. जो रथसप्तमीपर्यंत चालतो. यामुळे महिलांपासून ते लहान मुलांपर्यंत सगळीकडे विशेष उत्साह दिसतोय. मग यात सेलिब्रिटी देखील कशी बरे मागे राहतील. बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty Kundra) आणि बहिण शमिता शेट्टी (Shamita Shetty) हिने खास मराठमोळ्या अंदाजात मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देत आपल्या चाहत्यांना खुश केले आहे. शिल्पा शेट्टीने नुकताच हा व्हिडिओ शेअर केला आहे.
या व्हिडिओमध्ये शिल्पा आणि शमिता तिळगूळ-लाडूचे ताट समोर ठेवून मोठ्या आवाजात सर्वांना मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देत आहे. इतकंच नव्हे तर एकमेकींना लाडू भरवून 'तिळगूळ घ्या गोड गोड बोला' असं मराठीतून शुभेच्छा देत आहे.हेदेखील वाचा- Makar Sankranti 2021 Images: मकर संक्रातीनिमित्त मराठमोळी HD Greetings, Wallpapers, Wishes शेअर करुन आपले मित्र आणि नातेवाईकांना द्या गोड शुभेच्छा!
View this post on Instagram
इतकंच करुन या दोघी पुढे थांबल्या नाहीत. तर त्या या शुभेच्छा देत त्यांनी अंतरंगी डान्स देखील करताना दिसत आहे. ज्यावर त्या स्वत:च मनसोक्त हसताना आणि याचा आनंद घेताना दिसत आहे.
शिल्पा शेट्टी सोशल मिडियावर खूपच सक्रिय असते. आपल्या योगाचे व्हिडिओ, मजेशीर व्हिडिओ तसेच आपल्या रेसिपीजचे व्हिडिओ देखील ती टाकत असते. ती सर्व सणांना छान नटून थटून देखील व्हिडिओ बनवत असते. मागे तिने गुढीपाडव्याला देखील खास मराठमोळ्या अंदाजात नटून व्हिडिओ शेअर केला होता. जो प्रचंड व्हायरल झाला होता.
शमिताविषयी बोलायचे झाले तर ती गेल्या काही काळापासून रुपेरी पडद्यापासून थोडी दूरच आहे. मात्र आपल्या कुटूंबासोबतचे, मित्र परिवारासोबतचे अनेक व्हिडिओ ती सोशल मिडियावर शेअर करत असते.