कोरोना व्हायरस (Coronavirus) मुळे जगभरातील अनेक व्यवसायांचे तीन तेरा वाजले आहेत, व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंग (Social Distancing) पाळण्याचे आवाहन केले जात असताना अनेक ग्राहकांनी वेश्या व्यवसायाकडे (Prostitution) पाठ फिरवली आहे. परिणामी सेक्स वर्कर्सना (Sex Workers) रोजचा खर्च चालवणे सुद्धा कठीण होऊन बसले आहे. स्वित्झर्लंड (Switzerland) सरकारने या परिस्थितीत बदल घडवण्यासाठी आता एक नामी शक्कल लढवली आहे. कोरोना संक्रमणाच्या काळात सुरक्षित सेक्स करता यावा यासाठी सरकारतर्फे वेश्या व्यवसायांना सूचना देण्यात आल्या आहेत. यानुसार सेक्स वर्कर्सना ग्राहकांना दोनच पोझिशन मध्ये सर्व्हिस देण्याची परवानगी देण्यात आली आहे.
सेक्स वर्कर्सना सुरक्षित सेक्स (Safe Sex)साठी टिप्स सुद्धा देण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या संकटकाळात कोणत्या सेक्स पोझिशन (Sex Positions) करता येतील आणि त्यावेळी नेमकी काय काळजी घेणे आवश्यक आहे हे सांगणारी स्वित्झर्लंड सरकारच्या सूचना सविस्तर जाणून घ्या. हे ही वाचा - Sex मार्फत पसरू शकतो Coronavirus? COVID-19 बाधित रुग्णाच्या वीर्यात कोरोना विषाणू सापडल्याने संकटात भर पडण्याची शक्यता
सुरक्षित सेक्स साठी पोझिशन आणि टिप्स
-कोरोनाचे संकट असताना 'डॉगी स्टाईल' आणि 'रिव्हर्स काऊगर्ल' या दोन सेक्स पोझिशन अधिक सुरक्षित आहेत. या मध्ये दोन्ही पार्टनर्सचा समोरासमोर संपर्क येत नाही त्यामुळे नाक आणि तोंडाद्वारे व्हायरस पसरण्याची भीती कमी होते.
-प्रत्येक ग्राहकानंतर निदान 15 मिनिटांसाठी खोल्यांचे खिडकी दरवाजे उघडून हवा खेळती राहू द्या.
-प्रत्येक वेळी किमान 60 अंश तपमानावर बेडशीट आणि हात टॉवेल्स धुणे आवश्यक आहे. हे ही वाचा - Sex Survey: सेक्स साठी सोशल डिस्टंसिंग, लॉक डाऊन चे नियम तोडल्याची अनेकांनी दिली कबुली; पहा काय सांगतोय हा नवा सर्व्हे
-सेक्स करताना नाक आणि तोंड झाकण्यासाठी मास्क आवर्जून वापरा.
-हँडग्लोव्ह्ज, कंडोम आणि सॅनिटायजर यांचा पुरवठा केला जावा.
दरम्यान येत्या 8 जून पासून स्वित्झर्लंड मध्ये लॉक डाऊनचे आणखीन काही नियम शिथिल केले जाणार आहेत. यावेळी वेश्या व्यवसायाला सुद्धा काही प्रमाणात सूट देण्यात येणार आहेत. वास्तविक लॉक डाऊन जारी करण्यात आल्यापासून अधिकृत वेश्या व्यवसाय बंद आहे. मात्र अवैध पद्धतीने हे व्यवसाय अजूनही सुरु आहेत. अवैध वेश्या व्यवसायामुळे सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो याऐवजी सुरक्षा नियम फॉलो करून अधिकृत व्यवसाय सुरु करता यावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.