Rajasthan: राजस्थान मधील पाली येथील एका सर्पमित्राला फेसबुक लाईव्हच्या दरम्यानच सापाने चावले. खरंतर शेखावत नगर येथील स्थानिक असलेला मनीष वैष्णव याने मंगळवारी एका कोब्रा सापाला पकडले. याच दरम्यान त्याला तो चावला. कोब्राचे विष त्याच्या संपूर्ण अंगात पसरले गेले. त्यामुळे मनीष याला उपचारासाठी जोधपुर येथे दाखल करण्याआधीच त्याचा रस्त्यात मृत्यू झाला.(उत्तराखंड येथे सापडला दुर्मिळ दुतोंडी कोब्रा साप, वनाधिकाऱ्यांनी केली सुखरुप सुटका)
विषारी सापाला पकरणाऱ्या मनीष याचा मंगळवारी मृत्यू झाला आहे. 19 वर्षाच्या वयात मनीष याने जवळजवळ 200 सापांना पडकले होते. तसेच तो सापांना आपला मित्र समजत होता आणि त्यांच्यासोबत खेळायचा. ऐवढेच नव्हे तर सापांना पकडून सुरक्षित ठिकाणा सुद्धा तो सोडत होता. मंगळवारी नदीमध्ये एक विषारी कोब्राला सोडण्यादरम्यान त्याला तो चावला.
मनीष याच्या वडीलांची काही वर्षांपूर्वी आजाराने निधन झाले होते. घराची जबाबदारी आईवर होती. मनीष एका फॅक्ट्रित काम करत होता. परिसरात एकदा साप आल्यानंतर त्याने तो हिंमतीने त्याला मनीष याने हिंमतीने पकडला आणि त्याला जंगलात नेऊन सोडले. हळूहळू मनीष हा साप पकडण्यात तरबेज झाला. शहरात कोणच्याही घरी जर साप घुसल्यास मनीष याला फोन करुन त्यासाठी बोलावले जायचे. कोणत्याही शुल्काशिवाय मनीष हा त्यांच्या घरातील साप बाहेर काढून त्यांना सुरक्षित ठिकाणी सोडत असे.
दरम्यान, मंगळवारी त्याने एक साप पकडला आणि तो नदीत सोडण्यासाठी गेला. तेथेच त्याने सापाचा व्हिडिओ सुद्धा बनवण्यास सुरुवात केली. त्याचवेळी त्याला सापाने चावले. काही वेळानंतर त्याची प्रकृती बिघडू लागली. नातेवाईकांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेले असता त्याचा रस्त्यातच मृत्यू झाला.(साप चावल्याने संतप्त झालेल्या व्यक्तीने केले 'हे' विचित्र कृत्य, वाचा नक्की काय घडले)
साप पकडण्यापासून ते जंगलात सुरक्षित ठिकाणी पोहचवण्यासंदर्भातील काही व्हिडिओ मनीष याने सोशल मीडियात पोस्ट केले आहे. त्यामध्ये त्याने लोकांनी सापापासून कसा बचाव करावा याबद्दल त्याने व्हिडिओत सांगितले. मात्र त्याच्या एका चुकीमुळे कोब्राने त्याला चावले आणि मृत्यू झाला.