राहुल गांधी बँकॉक मध्ये नव्हे तर कंबोडिया मध्ये विपश्यना करत असल्याची शक्यता: सूत्र
Rahul Gandhi | (Photo Credit : Facebook)

महाराष्ट्र (Maharashtra) व हरियाणा (Hariyana) विधानसभेचं (Assembly Election 2019) तोंडावर काँग्रेस (Congress) पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) मागील कित्येक दिवसांपासून कुठल्याच प्रचारात अथवा सभेत दिसत नव्हते. याबाबत काल रात्री एक आश्चर्यकारक खुलासा झाला होता, ज्यानुसार मनःशांती साठी राहुल हे काही दिवस बँकॉक मध्ये फिरायला गेल्याचे म्हंटले जात होते  मात्र तूर्तास समोर आलेल्या माहितीनुसार राहुल हे बँकॉक (Bangkok) मध्ये नसून  कंबोडिया (Cambodia) मध्ये विपश्यना करत असल्याचे अंदाज बांधले जात आहेत. ट्विटर वरून कालपासूनच याबाबत चर्चा सुरु होत्या, अनेक युजर्सने तर राहुल यांची खिल्ली उडवायला देखील सुरुवात केली होती.

वास्तविक, राहूल गांधी हे एक स्वतंत्र नागरिक असून त्यांना त्यांच्या मर्जीप्रमाणे कुठेही फिरण्याची मुभा आहे मात्र, भारतात महाराष्ट्र्र व हरियाणा या दोन प्रमुख राष्ट्रांची विधानसभा निवडणूक येत्या काहीच दिवसांवर येऊन ठेपली असताना अशा प्रकारे एका पक्षाच्या मुख्य नेत्याने निघून जाणे हे नेटकऱ्यांच्या टीकेचे कारण ठरत आहे.

पहा ट्विट

दरम्यान, कॉंग्रेस पक्षाकडून राहुल गांधी यांच्या 'बॅंकॉक अथवा कंबोडिया ट्रीप' बद्दल कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही याचाच अर्थ अधिकृत माहिती अथवा वृत्त फेटाळण्यात न आल्याने सर्वांमध्ये संदिग्धता पाहायला मिळत आहे.

तूर्तास येत्या 21 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र व हरियाणा येथे विधानसभा लोकसभेच्या पराभवास काँग्रेस पक्षाला लागलेय गळतीमुळे अगोदरच पक्षाची हालात नाजून आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर निवडणूक पार पडणार आहेत, तोपर्यंत तरी राहुल गांधी परतणार का किंवा त्याआधी काँग्रे पक्ष यावर भाष्य करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.