Video: कांदिवली च्या एका टोलेजंग इमारतीच्या सज्जावर खाली डोकं वर पाय करुन तरुणाची जीवघेणी स्टंटबाजी, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
Stunt on Building in Kandivali (Photo Credits: Twitter)

सध्याच्या प्रसिद्धीसाठी किंवा सोशल मिडियावर व्हायरल होण्यासाठी अनेक तरुण तरुणी कसले कसले व्हिडिओ टाकतील याचा काही नेम नाही. कधी कोणी स्टंटबाजी करताना तर कधी बोल्ड व्हिडिओ, अर्वाच्य भाषेतील व्हिडिओ सोशल मिडियावर पोस्ट करतात. यात आपल्या मित्रपरिवारात आपली चलती राहण्यासाठी अनेक जण मोबाईल मध्ये आपले व्हिडिओ बनवून ते सोशल मिडियाच्या माध्यमातून ग्रुपमध्ये पोस्ट करतात. ज्यामुळे समोरचा व्यक्ती तो व्हिडिओ पुढे फॉरवर्ड करुन व्हायरल होत जाईल. नुकताच एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ मुंबईतील असून यात एक तरुण कांदिवलीच्या टोलेजंग इमारतीच्या सज्जावर उलटा हातावर उभा आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी हा स्टंट करणारा आणि तो व्हिडिओ शूट करणा-या दोघांविरोधात IPC कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या व्हिडिओमध्ये एक तरुण एका उंच इमारतीच्या सज्जावर खाली डोकं वर पाय करुन हातावर बराच वेळ उभा राहिलेला दिसत आहे. हृदयाचा ठोका चुकविणारा हा व्हिडिओ एकदा पाहा

हेदेखील वाचा- Shocking: 8 वर्षाच्या मुलीला आवडतं आपल्या 11 फुट पाळीव अजगरासोबत पोहायला, व्हिडिओ पाहून व्हाल हैराण; Watch Video

या व्हिडिओमधील तरुण निधड्या छातीने ही जीवघेणी स्टंटबाजी करत आहे. यात ही जीवावर बेतणारी ही स्टंटबाजी पाहून एका क्षणाला मनात असा विचार येतो की जर त्याचा तोल गेला वा स्वत: वरचा ताबा सुटला असता तर काय झाले असते? हा विचारही मनात धस्स करणारा आहे. त्यामुळे कृपया असे स्टंट्स करु नका. देवाने दिलेला हा जन्म फार अनमोल असून तो चांगल्या कामासाठी, सामाजिक सेवेसाठी खर्च करा.