अजगरासोबत खेळणारी मुलगी (फोटो क्रेडिट्स: रायटर वीडियो ग्रैब)

Shocking: जगातील जवळजवळ सर्वचं मुलं साप आणि सरपटणाऱ्या प्राण्यांना घाबरतात. मात्र, एका 8 वर्षाची मुलीला 11 फुट लांबीच्या अजगरासोबत खेळणं आणि पोहणं आवडतं. कदाचित हे ऐकून तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवणार नाहीत. पण हे सत्य आहे. इनबार (Inbar) नावाच्या 8 वर्षीय इस्त्रायली मुलीकडे लहान असल्यापासून एक पाळीव अजगर होता. इनबार या 11 फूट लांबीच्या पाळीव अजगरासोबत घरामागील स्विमिंग पूलमध्ये पोहते. इनबारने या अजगराचे नाव 'बेले' असं ठेवलं आहे. इनबारने सांगितलं की, 'अजगर मला वेळ घालवण्यासाठी मदत करते. कोरोनो व्हायरस साथीच्या कारणास्तव शाळा बंद आहेत. या काळात मला वेळ घालविण्यासाठी बेलेने मोठी मदत केली. मला सापांसोबत खेळायला आवडते आणि कोरोनोव्हायरस दरम्यान मी त्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करते.'

इनबारच्या कुटुंबाकडे केवळ एक अजगर नसून दक्षिणेकडील इस्त्राईलमधील कृषी भागातील प्राणी अभयारण्यात राहणारे इतर पाळीव प्राणीदेखील आहेत. इनबारची आई सरित रेगेव (Sarit Regev) ने सांगितलं की, “इनबार ला या सर्व प्राणी आणि सापांसोबत वाढविण्यात आले आहे. जेव्हा इनबार लहान होती, तेव्हा ती सापांसोबत आंघोळ करायची. आता ती सापासोबत तलावामध्ये पोहते. हे आमच्यासाठी हे खूप अभिमानास्पद आहे." (हेही वाचा -  Bengaluru: होसकोटे मधील Anand Dum Biryani दुकानाबाहेर खवय्यांची तुडुंब गर्दी; बिर्याणी खाण्यासाठी 1.5 किमी लांब रांग (Watch Video))

पहा व्हिडिओ -

आपल्या जीवनशैली आणि संगोपनाबद्दल लोकांनी केलेल्या टीकावर बोलताना सरित यांनी म्हटलं आहे की, “हे खूप चांगले जीवन आहे. जेव्हा एखादे मूलं प्राण्यांसोबत मोठे होते, तेव्हा तो इतरांवर प्रेम करणारी व्यक्ती बनते. ती स्वत: चा नव्हे, तर इतरांची काळजी घेणारी व्यक्ती बनते. मात्र, सोशल मीडियानर सरित यांच्या या कल्पनेचे अनेक नेटीझन्सने समर्थन केलेले नाही.