Hoskote’s Anand Dum Biryani (Photo Credits: ANI/ Twitter)

कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचा (Lockdown) अनुभव देशातील जनतेने घेतला. या काळात हॉटेल्स, रेस्टोरंट, फुडकोर्ड्स बंद होते. अनलॉक 5 (Unlock 5) च्या माध्यमातून हॉटेल, रेस्टोरंटची सेवा जनतेसाठी खुली करण्यात आली. त्यानंतर कर्नाटक (Karnataka) मधील बंगळुरु (Bengaluru) येथील होसकोटे (Hoskote) येथे बिर्यानी खाण्यासाठी खवय्यांची लांबच लांब रांग पाहायला मिळाली. ही रांग तब्बल 1.5 किमी पर्यंत लांब होती. याचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. कोविड-19 संकटातही बिर्यानी खाण्यासाठी खवय्यांनी मोठी गर्दी केली होती.

होसकोटे येथील आनंद दम बिर्यानी (Anand Dum Biryani) दुकानाबाहेर ही लांबच लांब रांग दिसून आली. रांगेत उभ्या असलेल्या एका ग्राहकाने सांगितले की, "मी येथे पहाटे 4 पासून उभा आहे. मला 6.30 ला बिर्यानी मिळाली. ग्राहकांची रांग 1.5 किमी लांब आहे. बिर्यानी स्वादिष्ट असल्याने लोक वाट बघण्यासाठी तयार आहेत. दरम्यान, पहाटे 5 वाजता आलेल्या ग्राहकाला सकाळी 5.10 ला बिर्यानी मिळाली. विशेष म्हणजे केवळ बिर्यानी खरेदीसाठी तो 35 किमी चा प्रवास करुन आला  होता."

"आनंद दम बिर्यानी हे दुकान गेल्या 22 वर्षांपासून सुरु आहे. आम्ही अन्नपदार्थात कोणतेही पिर्झरव्हेटीव्ह घालत नाही," असे दुकान मालकाने सांगितले. तसंच दिवसाला ते 100 किलो पेक्षा जास्त बिर्यानीची विक्री होत असल्याचेही त्यांनी अभिमानाने सांगितले.

ANI Tweet:

बिर्यानीच्या दुकानाचे मालक आनंद यांनी या दुकानाची सुरुवात इडली आणि चित्रना विकण्यापासून केली होती. त्यानंतर त्यांनी बिर्यानी बनवण्यास सुरुवात केली. सुरुवातीला फक्त काही किलो बिर्यानीच विकली जात होती. परंतु, लोकांचा वाढता प्रतिसाद पाहता आपला व्यवसाय वाढवायला सुरुवात केली.