Fake Tweet (Photo Credits: Twitter)

गेल्या काही महिन्यांपासून भारत-चीन मधील सीमावाद वाढला आहे. त्यामुळे सीमारेषेवर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. या गंभीर परिस्थितीत भारतीय सैन्यातील तब्बल 80,000 जवानांनी सुट्टीसाठी अर्ज केल्याचा दावा करणारे ट्विट सध्या व्हायलर होत आहे. सीक लीव्हसाठी हे अर्ज करण्यात आल्याचे या ट्विटमध्ये म्हटले असून ही परिस्थिती 45 वर्षांत प्रथमच उद्भवली असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या ट्विटमागील सत्यता पीआयबी फॅक्ट चेककडून तपासण्यात आली आहे.

80,000 जवानांनी सिक लिव्हसाठी अर्ज केल्याचा दावा करणारे ट्विट खोटे असल्याचे पीआयबीकडून सांगण्यात आले आहे. हा मेसेज फेक असून भारत-चीन तणावादरम्यान जवानांनी सुट्टीसाठी अर्ज केलेला नाही, असे स्पष्टीकरण पीआयबीने ट्विटच्या माध्यमातून दिले आहे. (Fact Check: प्रधानमंत्री कन्या आयुष योजनेअंतर्गत प्रत्येक मुलीला 2000 रुपये देण्यात येत आहेत? काय आहे यामागील सत्य? जाणून घ्या PIB चा खुलासा)

व्हायरल ट्विटमधील दावा: भारत-चीन तणावादरम्यान भारतीय सैन्यातील तब्बल 80,000 जवानांनी सुट्टीसाठी अर्ज केला आहे.

पीआयबी फॅक्ट चेक: हे ट्विट फेक असून भारत-चीन तणावादरम्यान जवानांनी सुट्टीसाठी अर्ज केलेला नाही.

Fact Check by PIB:

अशा प्रकारच्या विविध अफवा खोटे मेसेजेस, संदेश याद्वारे सोशल मीडियावर पसरवल्या जातात. अनेकदा लोकांची दिशाभूल करण्यासाठी तर कधी वाद निर्माण करण्यासाठी फेक न्यूजचा वापर केला जातो. कोरोनो संकट काळातही अनेक फेक मेसेजेस समोर आले. दिवसागणित त्यात अधिकच भर पडत गेली. मात्र पीआयबी फॅक्ट चेक किंवा प्रशासनाकडून सत्य बाजूचा उलघडा नेहमीच करण्यात आला आहे. तसंच नागरिकांनी अशा प्रकराच्या खोट्या मेसेजेसना बळी पडू नये, सत्य जाणून घेतल्याशिवाय मेसेज फॉरवर्ड करु नये, असे आवाहन वारंवार यंत्रणांकडून करण्यात आले आहे.