ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांच्याबद्दल दिले धक्कादायक वृत्त; पाकिस्तानी वृत्तवाहिनी Dawn News वर होत आहे जगभरातून टीका
Dawn News Falls for Fake News (Photo Credits: Twitter)

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन (British Prime Minister Boris Johnson) हे सध्या कोरोना विषाणू (Coronavirus) मुळे त्रस्त असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, पाकिस्तान (Pakistan) मधील एक महत्वाची वृत्तवाहिनी डॉनने  (Dawn News) चक्क जॉनसन यांचे निधन झाल्याचे वृत्त दिले. बीबीसी ब्रेकिंग न्यूज नावाच्या ट्विटर अकाऊंटवरून आलेल्या ट्विटद्वारे त्यांनी ही बातमी प्रसारित केली. काल दुपारी साधारण अडीच वाजता ब्रेकिंग न्यूज या मथळ्याखाली ही बातमी डॉनच्या वृत्तवाहिनीवर चालत होती. सध्या या गोष्टीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरस होत आहे.

पहा व्हिडिओ -

याबाबत इंडिया टुडेच्या अँटी फेक न्यूज वॉर रूमला (AFWA) तपासणीमध्ये असे आढळले की, डॉनने ज्या ट्विटर अकाऊंटचा रेफरन्स घेऊन ही बातमी दिली, तो बीबीसीचा एक बनावट ट्विटर हँडल आहे. बीबीसीचा मूळ ट्विटर हँडल दुसराच आहे. मात्र ज्या बनावट ट्विटरवर ही बातमी प्रसिद्ध झाली होती तिथून ती नंतर काढून टाकण्यात आली. मात्र एखादी राष्ट्रीय वृत्तवाहिनी वृत्ताचे शहानिशा न करता इतकी मोठी बातमी देते हे पाहून अनेकांनी डॉनवर टीका केली आहे.

डॉनच्या या चुकीबद्दल पत्रकार नाइला इनायत व अतिका रहमान यांच्यासह अनेकांनी ट्विट करत खरपूस समाचार घेतला आहे. दरम्यान, युकेचे कॅबिनेट कार्यालय मंत्री मायकेल गोव्ह यांनी मंगळवारी (7 एप्रिल) एलबीसी रेडिओला सांगितले की, सध्या पंतप्रधान व्हेंटिलेटरवर नसले तरी, पंतप्रधान डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत आणि त्यांना ऑक्सिजवर ठेवण्यात आले आहे. जगातील अनेक मध्यम संस्था, नेते, जनता जॉनसन यांच्या आरोग्यावर नजर ठेवून आहेत. (हेही वाचा: इंग्लंडचे पंतप्रधान Boris Johnson यांनाही कोरोना व्हायरस लागण, अतिदक्षता विभागात उपचार सुरु; परराष्ट्र मंत्री डोमिनिक सांभाळतातय कारभाराची सूत्रं)

बोरिस जॉनसन यांना रूटीन तपासणीसाठी रूग्णालयात नेण्यात आले, परंतु तिथे त्यांची तब्येत बिघडल्याने सोमवारी रात्री रुग्णालयाने त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्याचा निर्णय घेतला. सध्या परराष्ट्रमंत्री डॉमिनिक राब कामकाज पाहत आहेत.