आतापर्यंत फक्त ऐकले होती की, मानवासारखी अजून एक प्रजाती (Human Species)आहे. मात्र आता यावरून पडदा उठला आहे. कित्येक वर्षांपासून लुप्त झालेली,अगदी मानवासारखी एक प्रजाती फिलिपाईन्सच्या (Philippines) एका गुहेत सापडली आहे. फिलिपाईन्सचे सर्वात मोठे बेट लुझोन येथे ही प्रजाती आढळली आहे. सध्या या प्रजातीला होमो लुझोनेन्सीस (Homo Luzonensis)असे नाव देण्यात आले आहे. अहवालानुसार, होमो होमो लुझोनेन्सीस अवशेष लुझोनच्या उत्तरेस असलेल्या कॅलाओ गुहेत सापडले आहेत. असे म्हटले जात आहे की ते 67 हजार ते 50 हजार वर्षे जुने आहेत.
गुहेत सापडलेल्या या अवशेषांमध्ये दात, हात व पायाची हाडे सामील आहेत. 2007 मध्ये गुहेच्या उत्खननात हे अवशेष सापडले. चार माणसांचे हे अवशेष असून यामधील एक व्यक्ती तरुण आहे. हात व पाय यांच्या बोटे आतील बाजूला वळली आहेत, यावरून हे लोक झाडावर चढण्यात सराईत असतील असा अंदाज लावला जात आहे.
असा अंदाज लावला जात आहे की, या प्राचीन मानवांचा आफ्रिकेशी संबंध असू शकतो. जे नंतर दक्षिण-पूर्व आशियामध्ये स्थायिक झाले असावेत. यापैकी एक सर्वात बुटके 'हॉबिट' किंवा 'होमो फ्लोरेसीन्सिस' असावेत, जे इंडोनेशियाच्या फ्लोर्स बेटावर सुमारे 50 हजार वर्षांपर्यंत होते. लंडनच्या नॅचरल हिस्ट्री म्युझियमच्या प्रोफेसर ख्रिस स्ट्रिंगर यांनी 2004 मध्ये 'होमो फ्लोरेसीन्सिसबद्दल माहिती प्रकाशित केली होती.
होमो लुझोनेन्सीस काही वैशिष्ट्ये आजच्या मानवी प्रजातींसारखीच आहेत. तर काही अॅस्ट्रोलोपिथेसीनसारखे उभे राहून चालणे, आणि काही आफ्रिकेत आढळनाऱ्या माकडासारखी आहेत. असे मानले जाते की होमो इरेक्टस ही पहिली प्रजाती होती जी 1 दशलक्ष वर्षांपूर्वी आफ्रिकेतून बाहेर पडली. आता लुझोनेन्सीस जवळजवळ एख लाख वर्षांपूर्वी पृथ्वीवर होते, आणि 50 हजार वर्षांपूर्वी त्यांचे अस्तित्व संपले. त्यांच्या जाण्यानंतर आधुनिक माणसाच्या आगमन होण्याची वेळ आली.