ऐन जानेवारीत मुंबई मध्ये पावसाच्या तुरळक सरी; ट्वीटर वर मुंबईकरांनी #MumbaiRains सह शेअर केले Funny Memes, फोटो
Mumbai Rains (Photo Credits: @virus_vally/ Twitter)

काही दिवसांपूर्वी थंडीत गारठलेल्या मुंबईकरांची आजची सकाळ अचानक झालेल्या पावसाच्या शिडकाव्याने झाली आहे. ऐन जानेवारी महिन्यात मुंबईसह महाराष्ट्राच्या अनेक भागात रिमझिम पाऊस बरसून गेला आहे. काल रात्री पासूनच हलक्या सरी बरसत आहेत. त्यामुळे वातावरणात अचानक बदल झाला आहे. थंडी कमी झाली आहे. त्यामुळे ढगाळ  आभाळाचं सकाळी दर्शन झाल्याने अनेकांनी ट्वीटरवर आपल्या प्रतिक्रिया देत अवकाळी पावसाचे मिम्स शेअर केले आहेत. कामावर जाणार्‍या, बाहेर पडलेल्या मुंबईकरांनी सोशल मीडीयात या अवकाळी पावसातलं मुंबईचं चित्र फोटोज आणि व्हिडिओजच्या माध्यमातून शेअर केले आहे.

मुंबईमध्ये अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने 2 दिवसांपूर्वीच वर्तवली होती. मुंबई सोबतच ठाणे, पुणे, मराठवाडा, विदर्भ सह कोकणात पुढील 2-3 दिवस पावसाचे असतील असा IMD चा अंदाज आहे. रत्नागिरी, रायगड सह काही भागांत तर मेघ गर्जनेसह ऐन थंडीत पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मुंबईत अवकाळी पावसानंतर धम्माल मिम्स

ढगाळ वातावरणात मुंबईकरांची सकाळ

कलियुग?

मुंबईकर आणि लोकल

मुंबई मध्ये असा थंडीत पाऊस बरसण्याची ही काही पहिलीच वेळ नव्हे. मागील महिन्यातही अशाच प्रकारे पावसाच्या हलक्या सरी बरसून गेल्या होत्या. दरम्यान सध्या मुंबईत हवेची गुणवत्ता देखील खालावली आहे. दिल्लीपेक्षा मुंबईच्या हवेची पातळी खाली गेली आहे. पण अशाप्रकारे अवकाळी आलेला रिमझिम पाऊस काहींना मजेशीर वाटत असला तरीही त्याचा शेतीला फटका बसू शकतो. कोकण किनारपट्टीत आंबा आणि काजू पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे.