मुंबई मध्ये हवेची गुणवत्ता खालावली; पुढील 2 दिवसांत सुधारण्याची शक्यता
Mumbai Air Quality (Photo Credits: PTI)

मुंबई (Mumbai) मधील वातावरण खराब झाल्याचे दिसून येत आहे. सिस्टम ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च (SAFAR) नुसार, मुंबईमध्ये एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) 7 जानेवारी ला 309 इतके आहे. बुधवारी (6 जानेवारी) एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) 309 इतके नोंदवण्यात आले आहे. यापूर्वी आर्थिक राजधानी मुंबई मधील एअर क्वालिटी खूप खराब झाल्याचे दिसून येत होते. 1 जानेवारी ला हवेची गुणवत्ता 307 इतकी नोंदवण्यात आली होती. (Delhi Air Pollution: दिल्ली-NCR मध्ये बिघडली हवेची गुणवत्ता, राजधानीत AQI पोहचला 264 वर)

मुंबईतील वाढलेल्या थंडीमुळे प्रदुषण करणाऱ्या कणांचे योग्य रीतीने वितरण होत नसल्याने मुंबईतील एअर क्वालिटी खूप निकृष्ट दर्जाची झाली आहे, असे SAFAR च्या अधिकाऱ्यांनी एका रिपोर्टमध्ये सांगितले आहे. हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या रिपोर्टनुसार, पुढील 2 दिवसांत एयर क्वालिटी सुधारण्याची शक्यता आहे. परंतु, एयर क्वालिटी इंडेक्स Poor Catogary मध्येच असेल. 0-50 मधील एयर क्वालिटी मधील एयर क्वालिटी इंडेक्स हा चांगला समजला जातो. तर 50-100 मधील एयर क्वालिटी इंडेक्स हा समाधानकारक समजला जातो. 101 ते 200 मधील इंडेक्स हा मध्यम स्वरुपाचा तर 201-300 मधील इंडेक्स हा निकृष्ट दर्जाचा समजला जातो, 301 वरील इंडेक्स हा अतिशय निकृष्ट दर्जामध्ये गणला जातो.

गेल्या काही दिवसापासून शहरातील तापमान हे खूप कमी झाले आहे. अरबी समुद्रात झालेल्या वाऱ्यांच्या हालचालींमुळे हा तापमानातील फरक दिसून येत आहे. हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या रिपोर्टनुसार, बोरिवलीमधील एअर क्वालिटी सर्वात निकृष्ट दर्जाची म्हणजे 344 इतकी आहे. तर नवी मुंबईतील एअर क्वालिटी 329 इतकी आहे. दक्षिण मुंबईतील माजगांव येथे एयर क्वॉलिटी 327 तर अंधेरी आणि मालाड मध्ये 321 इतकी नोंद करण्यात आली आहे.

मुंबई उपनगरात किमान तापमानात घट झाली आहे. सांताक्रूझ येथे मंगळवारच्या किमान तापमानापेक्षा कमी तापमान 19.8 अंश सेल्सियस नोंदविण्यात आले. कुलाबा मध्ये किमान तापमान 21 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले असून ते मंगळवारच्या किमान तपमानापेक्षा 0.5 डिग्रीपेक्षा कमी आहे.