Moustache Bird Viral On Internet: मिशीवाल्या पक्षाचा फोटो इंटरनेटवर व्हायरल, लोकही म्हणतायत '‘मिशा असाव्यात तर या पक्षासारख्या'
Inca Tern | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

Inca Tern Goes Viral On Social Media: सोशल मीडिया (Social Media) म्हणजे जणू काही ट्रेण्डींगचेच माध्यम. रोज काही ना काही ट्रेण्ड होतच असते. कधी ते फायद्याचे कधी तोट्याचे तर कधी ते निव्वळ टाईमपास अशा दर्जाचे असते. सोशल मीडियावर आता अशाच एका मिशीवाल्या पक्षाचा (Moustache Bird) फोटो ट्रेण्ड होऊ लागला आहे. काही लोकांनी तर सोशल मीडियावर प्रतिक्रियाही दिल्या की, मिशी असावी तर या पक्षासारखी. या पक्षाची शारीरिक ठेवण आणि त्याची टोकदार मिशी इतकी वैशिष्ट्यपूर्ण की नजरच हटत नाही. हा मिशीवाला पक्षी आहे तरी कसा आणि त्याचे नेमके नाव काय घ्या जाणून.

आयपीएस अधिकारी दीपाशू काबरा यांनी या सुंदर पक्षाचा फोटो सोशल मीडियावर सेअर केला आहे. त्यांनी या पक्षाचा फोटो शेअर करुन 'मुछे हो तो' अशी कॅप्शनही दिली आहे. प्राप्त माहितनुसार या पक्षाचे नाव इंका टर्न (Inca Tern) असे आहे. (हेही वाचा, Amruta Fadnavis: अमृता फडणवीस यांचा पोपट राजभवनावर सापडला, म्हणाला 'My name is Tiger')

इंका टर्न हा पक्षी साधारण पेरू, चीली आदी देशांमध्ये आढळतो. तो साधारण 40 सेंटी मीटर (16 इंच) लाबं असतो. या पक्षातील नर आणि मादी सर्वसाधारण सारख्याच रंगाची दिसतात. प्रोढ इंका टर्न हा साधारण राखाडी रंगाचा असतो. त्याची चोच लाल रंगाची असते. चोचीच्या पाठीमागे डोळ्यांखालून एक पांढरा भाग मागे गेलेला असतो. हा भाग मिशीसारखा दिसतो आणि पंखाच्या रुपात हा मिशांच्या आकड्यासारखा मागे झुपकावतो. त्याचे डोळे चमकदार आण गोल असतात. तर पाय गडद लाल रंगाचे असतात. कमी वयाचे इंका टर्न हे साधारण जांभळसर तपकीरी रंगाचे असतात. बारकाईने पाहिल्यास हा पक्षी एखाद्या कार्टून कॅरेक्टरसारखा दिसतो.