रज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांचा पोपट अखेर राजभवन ( Raj Bhavan) परिसरात सापडला. फडणवीस यांचा पोपट(Amruta Fadnavis's Parrot) काही दिवसांपासून गायब होता. राजभवन हे राज्याच्या राज्यपालांचे निवासस्थान आहे. सध्या येथे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांचा निवास असतो. राजभवनाचे केअरटेकर राकेश जाधव यांना हा पोपट आढळून आला. मकाऊ प्रजातीचा हा पोपट (Macaw Parrot) आपल्याकडचा नाही हे लगेच त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी त्या पोपटाला पकडून त्याच्या मालकाचा शोध सुरु केला.त्यासाठी त्यांनी व्हॉस्टअॅप मेसेजही व्हायरल केला.
दरम्यान, हा पोपट अमृता फडणवीस यांचा असल्याचे त्यांना समजले. मुंबई मिररने याबाबत वृत्त दिला आहे. या वृत्तानुसार, फडणवीस जेव्हा आपल्या पोपटाला घेण्यासाठी पोहोचल्या तेव्हा त्यांनी आपल्या पोपटाला त्याच्या नावाने हाक मारली. त्यांच्या पोपटाचे नाव 'टायगर' आहे. त्यांनी टायगर म्हणून आवाज देताच तो त्यांच्या खांद्यावरच जाऊन बसला. (हेही वाचा, Amruta Fadnavis Tweet: कोरोना व्हायरस आणि पेग्विन महा सरकार विषाणू यांपासून दूर राहा- अमृता फडणवीस)
अमृता फडणवीस यांनी याबाबत सांगितले की, काही दिवसांपूर्वी त्यांच्या गार्डनमध्ये त्या पोपटासोबत खेळत होत्या. दरम्यान, अचाकन त्याला काही कावळ्यांनी घेरले आणि तो दूर निघून गेला. परत आलाच नाही. या घटनेला काही दिवस झाले. त्यांना वाटले की आता आपला पोपट 'टायगर' मेला. परंतू, टायगर मेला नव्हता. तो त्यांना पुन्हा सापडला.
दक्षिण अफ्रिकेच्या अमेजान प्रदेशात आढळणारा हा पोपट फडणवीस कुटुंबीयांनी एका ब्रीडरकडून खरेदी केला होता. अमृता यांनी सांगितले की, लॉकडाऊनच्या काही काळाूर्वीच तो त्यांच्या घरी आला होता. तसेच, तो या आधीही उडून दूर गेला होता. परंतू, तो पुन्हा परत आला होता.
राजभवनावरील केअरटेकर जाधव आणि विशाल यांनी सांगितले की, एक मोठा रंगीत पक्षी कावळ्यांच्या तावडीत सापडलेला दिसला. कावळ्यांनी त्याला घेरले होते. तसेच, एवॉन अपार्टमेंटमध्ये लावण्या आलेल्या कबुतराच्या जाळीमध्ये तो अडकला होता. दोन्ही केअरटेकर्सनी इमारतीच्या सातव्या मजल्यावरुन या पोपटाला ताब्यात घेतले. या मकाऊ पोपटाला काही दिवस त्यांनी सुरक्षेसाठी ठेऊन घेतले आणि त्यानंतर त्याच्या मालकाचा शोध घेणे सुरु केले. त्यासाठी त्यांनी काही व्हॉट्सअॅप मेसेजही ग्रुपवर पाठवले.