March Full Worm Supermoon 2020: सोशल मीडियामध्ये हुताशनी पौर्णिमेदिवशीच्या चंद्राच्या विलोभनीय दृश्यांचा धुमाकूळ (Photos)
Worm moon Pics (Photo Credits: Twitter)

Worm Supermoon 2020:  यंदा हुताशनी पौर्णिमेदिवशी जगभरात चंद्राचं दिमाखदार रूप पहायला मिळालं. आज सकाळपासूनच सोशल मीडियावर नासासह (NASA) अनेक खगोलप्रेमींनी Worm Moon ची टिपलेली काही खास छायाचित्र शेअर केली आहेत. त्यामुळे काल रात्री ज्यांना चंद्राचं विलोभनीय रूप पाहण्याची संधी मिळाली नाही त्यांच्यासाठी हे फोटो पर्वणी ठरत आहेत. सुपरमून या खगोलशास्त्रीय घटनेमध्ये चंद्र पृथ्वीच्या अधिक जवळ आल्याने 14% मोठा तर 30% अधिक चमकदार दिसतो. यंदा 9 मार्चची संधी हुकलेल्यांना 8 एप्रिल 2020 दिवशी पुन्हा अशाचप्रकारे सुपरमून पाहता येणार आहे.

9 मार्च दिवशी युनिव्हर्सल टाईम नुसार 5.48 PM दिवशी तर IST वेळेनुसार 11:18 PM वाजता वॉर्म मूनचं दृश्य दिसलं. चंद्राच्या ग्रहणाप्रमाणे सुपरमून पाहताना कोणतीही विशेष काळजी घेण्याची गरज नसते. थेट चंद्राकडे पाहून तुम्ही त्याच्या विलोनभनीय दृष्याच्या आनंद घेऊ शकता.

पहा Full Worm Supermoon 2020चं दृष्य

साधारण गजबजलेल्या शहरापासून दूर असलेल्या, प्रदुषणाचं प्रमाण कमी असलेल्या अनेक शहरांमध्ये चंद्राचं रूप विलोभनीय स्वरूपात पाहता आलं. तर काहींनी लेंस, दुर्बिण यांच्या मदतीने चंद्राचं रूप पाहिलं.