Uttar Pradesh: Mahant Bajrang Das Muni ने दिली महिलांना घरातून उचलून बलात्कार करण्याची धमकी; FIR दाखल
Mahant Bajrang Das Muni (PC - Twitter)

Uttar Pradesh: एका महंताच्या वादग्रस्त आणि चिथावणीखोर भाषणाने उत्तर प्रदेशात नवा वाद निर्माण झाला आहे. महंत बजरंग मुनी दास (Mahant Bajrang Das Muni) यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात ते हिंदू मुलींची छेड काढण्यासाठी दुसऱ्या समाजातील मुली आणि सुनेवर बलात्कार करण्याची धमकी देत ​​आहेत. साधूचा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यानंतर पोलीसांनी महंताविरोधात कारवाई केली आहे.

हा व्हिडिओ 2 एप्रिलचा असल्याचे सांगण्यात येत आहे. महर्षी श्री लक्ष्मणदास उदासी आश्रमाचे महंत बजरंग मुनी दास यांनी नवरात्री आणि हिंदू नववर्षासंदर्भात सीतापूरमध्ये काढलेल्या शोभायात्रेत हे प्रक्षोभक भाषण केले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये बजरंग मुनी दास हे बोलताना ऐकू येत आहेत की, जर एखाद्या हिंदू मुलीचा विशिष्ट समाजातील लोकांनी छेडछाड केली, तर तो त्यांच्या मुली आणि सुनेवर उघडपणे बलात्कार करेल. (हेही वाचा - Viral Video: नवविवाहित दाम्पत्याला लग्नात दिली पेट्रोल-डिझेल ची बॉटल भेट; मित्रांनी दिलेलं गिफ्ट पाहून वधू-वरांना बसला धक्का; पहा मजेशीर व्हिडिओ)

खैराबाद मशिदीजवळून मिरवणूक जात असताना महंतांनी हे वक्तव्य केल्याचे सांगण्यात येत आहे. हा साधू व्हिडिओमध्ये म्हणतो, "मी तुम्हाला हे प्रेमाने सांगत आहे की, जर तुम्ही खैराबादमध्ये एकाही हिंदू मुलीचा विनयभंग केलात तर मी तुमच्या सुनेला घरातून उघडपणे उचलून नेईन आणि तिच्यावर बलात्कार करीन."

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांनी एसीपी उत्तर राजीव दीक्षित यांच्याकडे तपास सोपवला आहे. तपास सुरू असल्याचे ट्विट सीतापूर पोलिसांनी केले आहे. प्राप्त वस्तुस्थिती व पुराव्यांच्या आधारे नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.