Viral Video: नवविवाहित दाम्पत्याला लग्नात दिली पेट्रोल-डिझेल ची बॉटल भेट; मित्रांनी दिलेलं गिफ्ट पाहून वधू-वरांना बसला धक्का; पहा मजेशीर व्हिडिओ
A Newly married couple was gifted bottles of petrol and diesel (PC - ANI)

Viral Video: लग्नाच्या भेटीत पेट्रोल आणि डिझेल! होय, आम्ही तुमची मस्करी नाही करत. परंतु, देशात पेट्रोल आणि डिझेलचे भाव इतके वाढले आहेत की, आता लोक आपल्या मित्रांच्या लग्नात शगुन म्हणून पेट्रोल-डिझेल देत आहेत. तामिळनाडूतील (Tamil Nadu) चेयुर (Cheyyur) येथे असाचं एक प्रकार घडला आहे. येथे ग्रेस कुमार आणि कीर्तना यांच्या मित्रांनी त्यांना लग्नात भेट म्हणून 1 लिटर पेट्रोल आणि 1 लिटर डिझेल दिले आहे. मित्रांनी दिलेली ही अनोखी भेट पाहून आधी या नवविवाहित जोडप्याला धक्काच बसला. नंतर आपल्या मित्रांची ही भेटवस्तू त्यांनी आनंदाने स्वीकारली.

वधू-वरानेही स्टेजवरच पेट्रोल आणि डिझेल घेताना मित्रांसोबत फोटो काढले. सध्या हे फोटोज सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. 22 मार्चपासून देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. किमती वाढल्याने तामिळनाडूवरही परिणाम झाला आहे. येथे एक लिटर पेट्रोलचा दर प्रतिलिटर 110.85 रुपये तर डिझेल 100.94 रुपये प्रति लिटरपर्यंत मिळत आहे. या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे. (हेही वाचा - DHL Cargo Plane: आपत्कालीन लँडिंग दरम्यान विमानाचे झाले दोन तुकडे; पहा व्हिडिओ)

दरम्यान, गेल्या 17 दिवसांत देशभरात पेट्रोल 10 रुपयांनी महाग झाले आहे. सरकारने त्यांच्या दरात जवळपास 80-80 पैशांची वाढ केली आहे. दिल्लीत सध्या पेट्रोल 105.41 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 96.67 रुपये प्रति लिटर आहे.