Dayaram Sahu (Photo credits: ANI)

आपली एखादी हौस आपल्याच स्वास्थ्यावर बेतणार आहे हे माहित असूनही ती पूर्ण करत राहणे म्हणजे अनेकांना मूर्खपणा वाटू शकतो. पण असे प्रसंग पाहिले की हौसेला मोल नाही या वाक्प्रचाराची खरी सार्थ पटते. असाच काहीसा प्रकार अलीकडे मध्यप्रदेश(Madhya Pradesh) मध्ये समोर आला. इतरांपेक्षा काहीतरी हटके करण्याची आवड जपताना दिंडोरी (Dindori) येथे राहणारे दयाराम साहू (Dayaram Sahu) हे मागील 45 वर्षांपासून चक्क काच (Glass) खात आहेत. व्यवसायाने वकील असणार हे महाभाग लहानपणापसूच काचेची बाटली, ग्लास आणि बरंच काही खात आले आहेत. जणू काही काच खाण्याचे आता त्यांना व्यसनच लागले आहे, एखादा सामान्य माणूस ज्या पद्दतीने रोजचे जेवण जेवतो त्याच पद्धतीने अगदी सहजपणे साहू हे काच खातात.

अलीकडेच त्यांच्या काच खाण्याचे व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियावर पाहायला मिळाले होते. साहू यांनी ANI वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये आपल्या या आवडीविषयी माहिती दिली. लहानपणीच आपल्याला काहीतरी हटके करायचे होते म्हणून आपण काच खाऊ लागलो पण कालांतराने ही एक सवयच बनली आता काच खाल्ल्यावाचून चैन पडत नाही असे साहू यांनी सांगितले आहे. तुम्हाला सुद्धा यावर विश्वास बसत नाहीये ना? मग त स्वतःचा पहा साहू यांचा हा विचित्र प्रताप

पहा व्हिडीओ

एकीकडे या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, साहू हे काचेची बॉटल अक्षरशः चावून खात आहेत. तर त्यानंतर आपल्याला ही सवय जडली असली तर इतरांनी याचे अनुकरण करू नये असेही साहू यांनी सांगितले आहे. (मध्य प्रदेश: पाऊस थांबविण्यासाठी बेडूक दाम्पत्याचा घटस्फोट; चंद्रावर पोहोचलेल्या विज्ञानवादी भारतातील धक्कादायक प्रकार)

दरम्यान, मागील काही वर्षात साहू यांना काच खाल्ल्याने दातांच्या समस्या जाणवू लागल्या आहेत त्यामुळे त्यांनी आता काच खाण्याचे प्रमाण कमी केले आहे. यापूर्वी त्यांचा त्यांची पत्नी व कुटुंबीय नेहमीच काच खाण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न करायचे मात्र साहू हे कोणालाही न जुमानता काच खाण्याचा हट्ट करत असे. यांनतर आता त्यांची पत्नी स्वतःच त्यांना काचेचे खाद्य पुरवण्याचे काम करते.