Mobile Explosion: मोबाईलचा हातातच स्फोट, थोडक्यात वाचले दुकानदार आणि ग्राहकाचे प्राण (पाहा व्हिडिओ)
Mobile Explosion (Photo Credit - Twitter)

मध्य प्रदेश (Madhya Pradesh) राज्यातील बालाघाट (Balaghat) येथे मोबाईलचा स्फोट (Mobile Explosion) घडला आहे. एका दुकानात घडलेली ही घटना सीसीटीव्ही (CCTV Video) कॅमेऱ्यात कैद झाली आहे. तसेच, ती सोशल मीडियावरही (Social Media) व्हायरल (Viral Video) झाली आहे. धक्कादायक असे की, मोबाईलचा स्फोट झाला त्यावेळी मोबाईल दुकानदाराच्या हातातच होता. त्याच वेळी एक ग्राहकही दुकानाच्या काउंटरला उभा होता. मोबाईलचा स्फोट होताच त्याने पळ काढला.

व्हायरल व्हिडिओत आपण पाहू शकता की, एका दुकानात दुकानदार उभा आहे. या वेळी एक व्यक्ती काऊंटरला येतो. बहुदा तो ग्राहक असावा. दोघे बोलत असताना दुकानदार आपला मोबाईल फोन होतात घेतो. तो ग्राहकाशी (काउंटरवरचा व्यक्ती) काहीतरी बोलत मोबाईलही हाताळत असतो. इतक्यात मोबाईलचा अचानक स्फोट होतो. दुकानदार तातडीने मोबाईल हातातून सोडून देतो. तो काऊंटरवरच पडतो. स्फोट झालेला मोबाईल जळत्या अवस्थेत काउंटरवर पडलेला पाहून दुकानदार काहीसा घाबरतो. तो क्षणाचाही विलंब न लावता आपल्या हातानेच तो पेटता मोबाईल दुकानाबाहेर ढकलतो. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ आपण इथे पाहू शकता. लेटेस्टली मराठी या व्हिडिओची पुष्टी करत नाही. (हेही वाचा, नाशिक येथे चार्जिंगला लावलेल्या MI मोबाईलचा स्फोट; घरातीन अनेक वस्तू जळाल्या)

व्हिडिओ

मोबाईल दुकानाबाहेर फेकल्यामुळे पुढचा अनर्थ टळला. यात दुकानदार आणि तो ग्राहकही सुरक्षीत असून कोणीही जखमी झाले नाही. दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ( CCTV Camera) ही संपूर्ण घटना कैद झाली आहे.