Triple Marriage: सध्या सोशल मीडियावर लग्नाशी संबंधित अनेक प्रकारचे व्हिडीओ तसेच बातम्या व्हायरल होत असतात. अशा परिस्थितीत याच्याशी संबंधित एक बातमी समोर आली आहे. मात्र ती खूपच धक्कादायक आहे. आफ्रिकन देशातून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. वास्तविक येथे एकाच मुलाशी 3 सख्ख्या बहिणींनी आपली रेशीमगाठ (Marriage) बांधली आहे. ही बातमी ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे. नेमकी हे सर्व प्रकरण काय आहे ते जाणून घेऊयात...
या तीन बहिणी एकाच व्यक्तीच्या प्रेमात पडल्या. त्यानंतर बहिणींनी अट घातली की, त्याला तिघींसोबत एकत्र लग्न करावे लागेल. डेली स्टारमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, तीन सख्य्या बहिणींशी लग्न करणाऱ्या व्यक्तीचे नाव लुविझो ( Luwizo) आहे. त्याचे वय 32 वर्षे आहे. लुविजोने एकाच वेळी नताशा, नताली आणि नाडेगे नावाच्या तीन सख्या बहिणींशी लग्न केलं. (वाचा - Watch Viral Video: वरमाळा समारंभात एका किरकोळ कारणावरून चिडलेल्या वराने वधूला कानशिलात लगावली)
लुविझो पहिल्यांदा नतालीला सोशल मीडियाच्या माध्यमातून भेटला आणि नंतर तो तिच्या इतर दोन बहिणींसोबतही रिलेशनशिपमध्ये आला. यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर बहिणींनी एक अट घातली की, त्या व्यक्तीला तिन्ही बहिणींसोबत लग्न करावे लागेल.
यासंदर्भात लुविजोने सांगितले की, हा निर्णय त्यांच्यासाठी खूप कठीण होता. माझ्या पालकांना अजूनही समजत नाही की, मी हे का केले? वास्तविक ही गोष्ट जगातील कोणत्याही व्यक्तीसाठी सामान्य नाही.
Luwizo from DR Congo has married 3 sisters. Triplets, for that matter. He met one on FB, visited her home, the other two fell for him pic.twitter.com/2EdE9k577Y
— The African Voice (@teddyeugene) March 2, 2022
तीन बहिणींपैकी एक वधूने सांगितले की, जेव्हा आम्ही तिघींनी एकत्र लग्नाची अट लुविजोसमोर ठेवली तेव्हा त्याला आश्चर्य वाटले. मात्र, नंतर त्याला आमची अट मान्य करावी लागली. आम्हा तिघी बहिणींचे त्याच्यावर खूप प्रेम आहे आणि म्हणूनच आम्हा सर्वांना त्याच्याशी लग्न करायचे आहे. ती पुढे म्हणाली की, लोकांना हे अशक्य वाटत असले तरी आम्ही तिघी बहिणी लहानपणापासून सर्व काही शेअर करत आलो आहोत. आता नवराही शेअर करणार आहोत. ही विचित्र बातमी ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. मात्र, आता हे अनोखे लग्न किती दिवस टिकते हे पाहावे लागेल.