
आपल्या कपड्यांमध्ये किडे, मुंग्या किंवा जीव-जंतू सापडणे हे अनेकांसाठी भितीदायक असू शकते. पण जर तुम्हाला तुमच्या ब्राच्या (Bra) आत एक लहान पाल (Lizard) लपलेली दिसली तर? कल्पनाही करवत नाही ना? मात्रे असे घडले आहे. ही घटना ब्रिटनमधील लिसा रसेल नावाच्या महिलेच्या बाबतीत घडली. जेव्हा लिसा आपल्या कॅरेबियन सुट्टीवरुन घरी परतली तेव्हा तिला आपल्या ब्रामध्ये जिवंत पाल सापडली. अशा प्रकारे या पालीने ब्रामधून ब्राबाडोस पासून रॉदरहॅम पर्यंतचा 4000 मैलांचा प्रवास केला.
ही पाल रसेलच्या ब्रामध्ये लपून बसली होती. महिलेने तिचा जवळजवळ 6000 किमीचा प्रवास करून घर गाठले, तेव्हाही ही पाल तिथेच होती. प्रवास पूर्ण केल्यानंतर जेव्हा तिने सुटकेस अनपॅक करायला सुरुवात केली, तेव्हा तिला सुटकेसमधील ब्रामध्ये ही पाल आढळली. ही काळ्या रंगाची पाल होती, जी सुटकेसमध्ये फिरत होती. आपल्या ब्रामध्ये पाल पाहून रसेल जोरात किंचाळली व त्यानंतर तिने ही पाल प्राणी संगोपन संस्थेला दिली.
रसेल म्हणाली की, 'मला हे आश्चर्यकारक वाटले की लहान पाल कोणत्याही अस्वस्थतेशिवाय इतका दीर्घ प्रवास करू शकते. कदाचित ती तिच्या नवीन पॅडमध्ये आनंदी असावी. प्रवासामध्ये ही पाल चिरडली गेली नाही याचेही आश्चर्य आहे, कारण माझी सूटकेस खूप भरली होती. जेव्हा आम्ही परतत होतो तेव्हा मी त्याच्यावर बसलेही होते.' (हेही वाचा: Snake Viral Video: उंदीर पकडण्याच्या नादात दुकानदाराच्या अंगावर पडला साप, पाहा व्हिडिओ)
लिसाने या पालीला 'रॉयल सोसायटी फॉर द प्रिव्हेन्शन ऑफ क्रूरल्टी टू अॅनिमल्स' संस्थेला सोपवले. या पालीला 'बार्बी' असे नाव दिले आहे. दुसऱ्या देशातून आलेल्या पालीला यूकेमध्ये सोडणे हे बेकायदेशीर ठरू शकते, त्यामुळे तज्ज्ञ तिला प्राणीसंग्रहालय किंवा वन्यजीव उद्यानात घेऊन जातील जिथे ती इतर प्राण्यांसह सुरक्षितपणे राहू शकेल.