Snake Viral Video: उंदीर पकडण्याच्या नादात दुकानदाराच्या अंगावर पडला साप, पाहा व्हिडिओ
Snake Viral Video | (Photo Credits-Twitter)

साप (Snake), उंदीर (Mus) आणि दुकानदार यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) झाला आहे. उंदीर पकडण्याच्या नादात दुकानात शिरला साप. पण, उंदीर इतका चपळ की सापाला सापडलाच नाही. मग हा उंदीर पकडण्याच्या नादात सापाचा अंदाच चुकला आणि तो चक्क दुकानदाराच्या अंगावर पडला. बेसावध असलेल्या असे काही घडेल याची सुतराम कल्पना नव्हती. काऊंटरवरुन दुकानात बसण्याच्या तयारीत असलेल्या दुकनदाराच्या खंद्यावर हा साप पडला. सुरुवातीला दुकानदाराला काही कळलेच नाही. पण अंगावर पडलेली जड वस्तू साप आहे हे जेव्हा त्याला त्याला कळले तेव्हा मात्र जे घडले ते पाऊन तुम्हालाही धक्का बसेल. भलताच मजेशीर (Funny Videos) आणि फनी व्हिडिओ (Interesting Video) तुम्ही पाहिला आहे काय?

सोशल मीडियावर व्हायल झालेल्या या व्हिडिओत आपण पाहू शकता की, एक मुलगा (जो हे दुकान सांभाळतो) दुकानात प्रवेश करत आहे. नेहमीची सवय असल्याने तो सराईतपणे काऊंटरवर चढतो आणि दुकानात प्रवेश करु पाहतो. इतक्यात त्याच्या अंगावर एक भालामोठा साप पडतो. हा साप एका उंदराच्या पाठी लागलेला असतो. उंदीरही इतका चपळ की सापाला सापडतच नाही. (हेही वाचा, Snake Videos: फाटक ओलांडून घरात घुसला फणाधारी नाग, महिलेने काठीने हाकलला (पाहा व्हिडिओ))

ट्विट

दरम्यान, चपळ उंदीर थेट छतावरुन खाली जमीनीवर उडी मारतो. लगेच सापही उंदरापाठोपाठ जमीनीकडे झेपातो. पण उंदीर पकडण्याच्या नादात तो दुकानदाराच्या अंगावर पडतो. अर्थात, उंदराच्या पाठी लागलेल्या सापाला कदाचित कल्पनाही नसेल की आपण एका मानसाच्या खांद्यावर पडलो आहोत. पण, एकडे दुकानदाराची मात्र भीतीने चांगलीच भंबेरी उडते. कशी ती तुम्ही व्हिडिओतच पाहा. या व्हिडिओवर युजर्नसी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. भाजप प्रदेश सह संगठण महामंत्री हितानंद (Hitanand) आपल्या @HitanandSharma या ट्विटर हँडलवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे.