Snake | (Photo Credits-Twitter)

साप (Snake) म्हटलं की आपल्यापैकी अनेकांच्या मनात भीती निर्माण होते. त्यात फणा काढणारा नाग म्हटल्यावर तर अनेकांचे डोळेच विस्फारतात. पण काही लोक मात्र सापाला मुळीच घाबरत नाहीत. सोशल मीडियावर अशाच एका महिलेचा व्हिडिओ व्हायरल (Woman Viral Video) झाला आहे. जी सापाला न घाबरता घराबाहेर हाकलवत आहे. फाटक ओलांडून घरात घुसलेल्या नागाला महिला घराबाहेर काढत असताना त्याने फणाही उगारल्याचे व्हायरल व्हिडिओत (Snake Viral Video) पाहायला मिळते. इतकेच नव्हे तर फणा काढलेला नाग (nake Video) फणा कायम ठेऊन तो मागे सरतानाही या व्हिडिओत दिसतो.

व्हिडिओत आपण पाहू शकता की एक महिला एक लांब लाकडी काठी घेऊन सापाला आपल्या घराच्या फाटकाबाहेर हुसकावून लावत आहे. सापाला हकलवत असताना त्याने अचानक फणा काढला आणि महिलेच्या लक्षात आले की हा साप नव्हे तर हा नाग आहे. ला नाग फार लांब नसला तरी बराचसा मोठा होता. त्याने फणा काढला तरी महिला मुळीच घाबरली नाही. तिने धिराने नागाला हाकरण्याचे काम सुरुच ठेवले. अखेर नागानेच माघार घेतली. फणा कायम ठेऊन नाग मागे सरकत राहिला. हळूहळू तो फाटकाबाहेर गेला. मग महिलेनेही त्याचा पिच्छा करत फाटकाबाहेर जात नागाला हूसकून लावले. फाटकाबाहेरील झुडूपात नाग निघून गेला. (हेही वाचा, साप चावल्यावर या 7 प्रकारे मानवी शरीरात चढते विष, होतो मृत्यू; वाचा महत्त्वपूर्ण माहिती)

व्हायरल व्हिडिओ

आयएएस अधिकारी सुप्रिया साहू यांनी आपल्या ट्विटर हँडलवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. ट्विटर हँडलवर व्हिडिओ शेअर करत सुप्रिया साहू लिहितात की, 'माहिती नाही या महिला कोण आहेत. मात्र त्या 3 C प्रमाणे नागाला हँडल करत आहेत. अत्यंत थंडपणे आणि योग्य पद्धतीने.' पुढे त्यांनी म्हटले आहे की, आपल्याला अशाच लोकांची गरज आहे जे वन्यजीवांची किंमत करतील. या व्हिडिओखाली अनेक ट्विटर युजर्सनी या महिलेवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. अनेक लोकांनी म्हटले आहे की, हा साप अत्यंत विषारी होता. परंतू, महिलेने मोठ्या शताफीने त्याला हाकलवून लावले.