Mumbai News: धारावी येथील कामराज मेमोरियल इंग्लिश हाय अॅड ज्युनियर कॉलेजच्या सुमारे ३० विद्यार्थ्यांना जेवणाच्या वेळी त्यांच्या एका प्लेटमध्ये पाल आढळल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे शाळेच्या वातावरण अशांतता पसरली आहे. सर्व विद्यार्थ्यांना सायन येथील खासगी क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. (हेही वाचा- किळसवाणे! आईस्क्रीम विक्रेत्याने हस्तमैथुन करून ग्राहकाच्या फालुदामध्ये मिसळले वीर्य व मूत्र;
मिळालेल्या माहितीनुसार, शाळेच्या मध्यान्ह भोजन उपरोक्त शाळेने दिले नसून शेजारील जेपी हॉटेल येथून देण्यात आले होते. या प्रकरणी शाहू नगर पोलिसांनी तक्रार नोंदवला आहे. "जे पालक आपल्या मुलांसाठी दुपारचे जेवण आणि नाश्ता बनवू शकत नव्हते त्यांनी जेपी हॉटेलशी करार केला होता, जे दररोज शालेय मुलांना दुपारचे जेवण देतात. त्यात मुख्यतः इडली, सांभर पदार्थ होते," अशी माहिती एका पोलिस अधिकाऱ्यांने दिली.
बुधवारी मुलांना नास्ता देण्यात आला असाताना एका मुलाला सांभारात पाल तरंगताना दिसली. घाबरेलल्या मुलांनी या घटनेची बाब शिक्षकांना दिला. मुलांना अन्न विषबाधा चाचणीसाठी जवळच्या आयुष नावाच्या क्लिनिकमध्ये नेण्यात आले. विद्यार्थी ५ आणि ६ च्या वर्गातले होते. पोलिसांनी माहिती दिली की, कोणत्याही मुलाला विषबाधा झाली नाही त्यामुळे सर्वांना त्यांच्या पालकांसह घरी परत पाठवण्यात आले आहे. पोलिसांनी हॉटेलमालकावर गुन्हा दाखल केला आहे.