Man Steals Sneakers in Bengaluru: सोशल मीडियावर दररोज नवनवीन व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत असतात. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक चोर घराबाहेरून शूज चोरताना (Man Steals Sneakers) दिसत आहे. फुटेजमध्ये, चोर स्नीकर्स चोरण्यापूर्वी त्याची झीज तपासत असल्याचंही दिसत आहे. बेंगळुरू (Bengaluru) मधील या व्हिडिओमुळे आता सर्वांनाचं सावध केलं आहे. व्हिडिओमध्ये, एक व्यक्ती हातात मोठी गोणी घेऊन कॉरिडॉरमध्ये प्रवेश करताना दिसत आहे. त्यानंतर तो इमारतीतील कॉरिडॉरमध्ये ठेवलेल्या शूजची तपासणी करतो. काही सेकंदांसाठी, तो कॉरिडॉरच्या दुसऱ्या बाजूने दिसतो. नंतर तो शूजचे दोन जोड घेऊन येतो. शूजच्या रॅकमधून तो एक-एक शूजची जोडी चेक करतो. अखेरीस, तो चोरलेले शूज त्याच्या सॅकमध्ये ठेवून शांतपणे निघून जातो.
या घटनेचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला होता. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'शू चोरीचे दृश्य सी-ब्लॉक, एईसीएस लेआउट, ब्रूकफिल्ड, बेंगळुरू येथे 6 महिन्यांत दुसऱ्यांदा घडले.' हा व्हिडिओ पोस्ट केल्यापासून, व्हिडिओला जवळपास 7 हजाराहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच नेटकरी यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. (हेही वाचा -Temple Theft Caught on Camera in Andhra Pradesh: आंध्र प्रदेशातील अम्मावारी मंदिरात चोरी, चोरट्याने पळवली दान पेटी, घटना CCTV कैद)
पहा व्हायरल व्हिडिओ -
View this post on Instagram
या व्हिडिओवर एका इंस्टाग्राम वापरकर्त्याने टिप्पणी केली की, 'एकदा, माझ्या इमारतीत, कोणीतरी सर्व मजल्यावरील सर्व शूज चोरले, परंतु त्यांनी तळमजल्यावर माझे शूज मागे ठेवले. माझे शूज त्याच्यासाठी पुरेसे चांगले नव्हते का? मला खूप वाईट वाटले.' दुसऱ्या एका वापरकर्त्याने म्हटलं आहे की, 'यापासून वाचण्यासाठी उपाय म्हणजे फक्त एक बूट बाहेर आणि एक बूट आत ठेवणे.' तिसऱ्या वापरकर्त्याने म्हटलं आहे की, 'हे बंगळुरूमध्ये सर्वत्र होत आहे.'