
भुक ही एक अशी गोष्ट आहे जी भल्याभल्यांना वेडंपिसं करून सोडू शकते असे म्हणतात, पण याच वाक्याचा सोदाहरण प्रत्यय अलीकडे व्हायरल झालेल्या एका व्हिडीओ मध्ये पाहायला मिळाला. पेनसिल्व्हेनिया (Pennsylvania) येथील एका सर्प उद्यानात एक किंगसाईझ साप हा भुकेने इतका व्याकुळ झाला होता की त्यामुळे चक्क त्याने दुसरा प्राणी समजून स्वतःचेच शरीर गिळायला सुरुवात केली. या प्रसंगाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओला अवघ्या काहीच तासात लाखहुन अधिक जणांनी बघितले आहे. या व्हिडिओमध्ये जेसी रॉथकेर (Jesse Rothacker) नामक एक व्यक्ती या सापाचे शूटिंग करताना पाहायला मिळत आहे.
पहा व्हायरल व्हिडीओ
जस की तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता, हा साप केवळ स्वतःला गिळत नसून थोड्याथोड्या वेळाने रवंथही करत आहे. याबाबत रॉथकेर यांनी व्हिडिओमध्ये सांगितल्यानुसार या किंग स्नेक प्रजातीच्या सापांना इतर प्राण्यांना खाण्याची सवय असते, कित्येकदा ते स्वतःलाही चावतात, मात्र ते कधीही स्वतःला गिळत नाहीत. याशिवाय व्हिडिओमध्ये रॉथकेर हा सापाच्या तोंडावर सतत मारत आहे, साप खात असताना अशा प्रकारे मारल्याने ते अस्वस्थ होऊन खाणे थांबवतात असेही रॉथकेर यांनी म्हंटले आहे. (राजस्थान येथे 13 फूट लांब अजगराने कुत्र्याला गिळले, पहा व्हिडिओ)
दरम्यान यापूर्वी अनेकदा अजगराने साप किंवा कुत्रा गिळल्याच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतील पण अशाप्रकारे सापाने स्वतःला गिळल्याचा हा बहुधा पहिलाच प्रसंग असावा.