PM Modi addressing the nation | (Photo Credits: ANI)

How Many Zeros in 20 Lakh Crore: शाळेत गणित विषयात  पैकीच्या पैकी मार्क मिळवले तरीही काल अनेकांची खरी परीक्षा होती. कारण  20 लाख कोटीमध्ये 2 वर किती शुन्य असतात याचं उत्तर तुम्ही देऊ शकता का? जर तुम्ही बोटांवर आकडेमोड करायला घेतली असेल तर तुम्ही एकटेच नाहीत कारण काल रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi)  या खास आर्थिक पॅकेजची घोषणा केल्यानंतर आता सोशल मीडियावर अनेक युजर्स या प्रश्नाचं उत्तर शोधताना पहायला मिळाले. कोरोना व्हायरस संकटात सामान्यांचं नुकसान होऊ नये म्हणून भारत सरकारने जीडीपीच्या 10% म्हणजे एकूण 20 लाख कोटीच्या (20 Lakh Crore) आर्थिक पॅकेजची तरतूद केली आहे. या घोषणेनंतर काहीजण त्यांच्या वाट्याला प्रत्येकी किती रूपये येणार याचं गणित मांडताना एकीकडे दिसले तर दुसरीकडे 2 वर नेमके किती शून्य म्हणजे 20 लाख कोटी या प्रश्नाचं उत्तर शोधताना दिसले. Coronavirus: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना जाहीर केले 20 लाख कोटी रुपयांचे पॅकेज.

20 लाख कोटी म्हणजे 2 वर 13 शून्य! 'लाख कोटी' मध्ये एकूण 12 शून्य असतात. 20 मध्ये एक शून्य आधीच असल्याने 20 लाख कोटीत एकूण 13 शून्य असतात. 12 शून्य जोडल्यानंतर मूल्य ट्रिलियन असे संबोधलं जातं. यासाठी 20 लाख कोटीला 200,00,00,00,00,000 असं लिहलं जातं. आंतरराष्ट्रीय बाजरात भारताचं हेच पॅकेज 20 ट्रिलियन रूपये असे देखील संबोधले जाईल.

सोशल मीडियात चर्चा

शून्यांचा प्रश्न 

नेमके शून्य किती? 

गूगल सर्च 

दरम्यान काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आत्मनिर्भर भारत अभियानाची घोषणा करताना यंदा 2020 मध्ये 20 लाख कोटीची तरतूद करून आपण भारत देशाला आत्मनिर्भर बनवू शकतो. त्यासाठी त्यांनी पंचसूत्री देखील सांगितली आहे. दरम्यान येत्या काही दिवसात भारताच्या अर्थमंत्रालयाकडून या पॅकेजमधील आर्थिक तरतुदींची स्पष्ट माहिती दिली जाईल.