Vaccine Fear: लसीकरणाच्या भीतीने झाडावर चढली मुलगी, व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल लोटपोट; Watch Viral Video
लसीकरणाच्या भीतीने झाडावर चढलेली मुलगी (Photo Credits: Twitter)

Vaccine Fear: कोरोना व्हायरसमुळे गेली दोन वर्षे संपूर्ण जग अत्यंत वाईट टप्प्यातून जात आहे. कोरोनाच्या दोन लाटांनंतर आता लोक तिसऱ्या लाटेच्या भीतीने जगत आहेत. या साथीच्या रोगाविरूद्ध लसीकरण मोहीम देखील जोरात सुरू आहे. अधिकाधिक लोक लस घेऊन कोरोनाविरुद्ध सुरू असलेल्या या युद्धात आपली भूमिका बजावत आहेत. त्याच वेळी, लस न मिळाल्याची अनेक कारणे शोधणारे आणि लस घेण्यास टाळाटाळ करणारे बरेच लोक आहेत. पुन्हा एकदा असेच दृश्य पाहायला मिळाले आहे. एक मुलगी लस घेण्याच्या भीतीने झाडावर चढली आणि लस घेणार नाही, असं म्हणत ओरडू लागली. या व्हिडिओमध्ये ही मुलगी लस न घेता पळून जाण्याचा प्रयत्न करत आहे. या मुलीला पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. (वाचा - Cow Eating Panipuri: रस्त्याच्या कडेला असलेल्या स्टॉलवर गाईने आपल्या वासरासह खाल्ली पाणीपूरी; Watch Viral Video)

वास्तविक, या साथीच्या आजारावर मात करण्यासाठी वैद्यकीय कर्मचाऱ्यांची टीम घरोघरी जाऊन लोकांना लस देण्याचे काम करत आहे. परंतु अजूनही अनेक लोक लस घेण्यास घाबरत आहेत. त्याचवेळी, लसीपासून पळून जाणाऱ्या या मुलीचा व्हिडिओ अनुराग नावाच्या अकाऊंटवरून ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला त्याने कॅप्शन लिहिलं आहे की, मध्य प्रदेशातील छत्तरपूर जिल्ह्यातील मानकरी गावात लस देण्यासाठी एक टीम पोहोचते. या टीमला पाहून एक मुलगी झाडावर चढते. मात्र, हे आरोग्य कर्मचारी त्या मुलीला समजावून खाली आणतात आणि तिला लस देतात.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, लसीची टीम जेव्हा या मुलीकडे लस देण्यासाठी पोहोचते तेव्हा मुलगी घाबरते आणि झाडावर चढते. झाडावर चढल्यानंतर मुलगी म्हणते की, तिला लस घ्यायची नाही. अशा स्थितीत वैद्यकीय कर्मचारी तिला वारंवार झाडावरून खाली येण्याचा आग्रह करतात. खूप प्रयत्न केल्यानंतर, मुलगी शेवटी झाडावरून खाली येते आणि समजावल्यानंतर लस घेण्यास तयार होते.