सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत आहे. यात लोकप्रिय व्हॉट्सअॅप (WhatsApp) रोज रात्री 6.30 तासांसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकारने अशा प्रकराचे आदेश दिले असून व्हॉट्सअॅप रात्री 11.30 ते सकाळी 6 पर्यंत बंद असेल, असा दावा त्यात करण्यात आला आहे. तसंच हा मेसेज फॉरवर्ड न करणाऱ्यांचे व्हॉट्सअॅप अकाऊंट बंद होईल आणि पुन्हा अॅक्टीव्हेट करण्यासाठी मासिक शुल्क आकारण्यात येईल, असेही त्यात म्हटले आहे. दरम्यान, हा मेसेज सोशल मीडिया माध्यमात वेगाने पसरत आहे.
प्रेस इन्फॉरमेशन ब्युरोने हा मेसेज फेक असल्याचे म्हटले आहे. पीआयबीने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, " हा दावा खोटा असून केंद्र सरकारने अशा प्रकराचा कोणताही आदेश दिलेला नाही." त्याचबरोबर अशा प्रकराच्या निराधार आणि फेक बातम्यांना बळी पडू नका, असे पीआयबीने म्हटले आहे. (Fact Check: देशात विक्रमी कोरोना लसीकरण झाल्याच्या आनंदात सरकार देत आहे मोफत 3 महिन्यांचा मोबाईल रिचार्ज? जाणून घ्या व्हायरल मेसेजमागील सत्य)
Fact Check By PIB:
दावा: केंद्र सरकार के आदेशानुसार #WhatsApp को रात 11:30 बजे से सुबह 6 बजे तक बंद किया जाएगा, वायरल मैसेज फॉरवर्ड न करने पर अकाउंट बंद कर दिया जाएगा और इसे एक्टिवेट कराने के लिए मासिक चार्ज देना होगा।#PIBFactCheck: यह दावा फर्जी है। केंद्र सरकार ने ऐसा कोई आदेश नहीं दिया है। pic.twitter.com/SmGIH5vRix
— PIB Fact Check (@PIBFactCheck) October 6, 2021
व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इंस्टाग्राम सोमवारी रात्री डाऊन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी हा फेक मेसेज व्हायरल होऊ लागला. दरम्यान, DownDetector या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, 4 ऑक्टोबर रोजी रात्री 11.30 वाजता हे तिन्ही अॅप जगभरात डाऊन झाले होते. त्यामुळे युजर्संना कॉल, मेसेज, पोस्ट करणे शक्य होत नव्हते. अखेर 7 तासंच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर अॅपची सेवा पुर्ववत झाली.